शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
16
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
17
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
18
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
19
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
20
देश सर्वप्रथम!- नि:स्पृह राष्ट्रसाधनेची १०० वर्षे!

‘नटखट’ प्रवास...

By admin | Updated: December 30, 2014 00:22 IST

कंपनीतील नोकरी, टेम्पोचालक ते नाटक, मराठी-हिंंदी चित्रपटांतील दिग्गज नायक... पडद्यावर खलनायक रंगवणारा परंतु प्रत्यक्ष आयुष्यात नायकच...

पुणे : कंपनीतील नोकरी, टेम्पोचालक ते नाटक, मराठी-हिंंदी चित्रपटांतील दिग्गज नायक... पडद्यावर खलनायक रंगवणारा परंतु प्रत्यक्ष आयुष्यात नायकच... एकदा धडक द्यायची म्हणून ठरवलं की एक तर भीत तुटणार किंंवा डोकं फुटणार हेच गमक आयुष्यभर पाळत आलेला बिनधास्त परंतु आपल्या तत्त्वांशी प्रामाणिक असणाऱ्या सच्चा कलाकाराचा ‘नटखट’ प्रवास रविवारी उलघडला. निमित्त होते प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी यांच्या ‘नटखट’ या आत्मचरित्रपर पुस्तक प्रकाशनाचे. कुटुंबीय, समकालीन कलाकार, दिग्दर्शक, मित्रवर्य यांच्या आठवणीतून, अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत, दृकश्राव्य माध्यमातून ज्येष्ठांनी व्यक्त केलेल्या भावनांमधून जोशी यांचा प्रवास उलगडत गेला.पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते आणि राज्याचे अन्नपुरवठामंत्री गिरीश बापट, ज्येष्ठ रंगकर्मी विद्याधर वाटवे, ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, अशोक कोठावळे, जोशी यांच्या पत्नी तसेच मुलगी गौरी जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या वेळी बोलताना बापट म्हणाले, मी आणि मोहन आते-मामे भावंडं आहोत. नाते सांगून ओळख सांगण्यापेक्षा कर्तृत्वाने ओळख सांगणे जास्त महत्त्वाचे असते त्यामुळे आजवर दोघांनीही कधी नात्याची ओळख सांगितली नाही. कष्ट केले तर आयुष्यात खूप मोठा पल्ला गाठता येतो हे मोहन यांनी सिद्ध करुन दाखवले आहे. डॉ. जब्बार पटेल म्हणाले, की भूमिका करणे अवघड काम असते. भूमिका करताना आजूबाजूचा प्रसंग टिपत जाऊन तो अभिनयात रुजवून सादरीकरण करणे त्याहून अवघड असते. त्यामुळे एखादा कलावंत जेव्हा लिहितो तेव्हा तो इतिहास होतो. (प्रतिनिधी)घाशीराम व मोहन जोशी हेच समीकरण झाले असते -‘घाशीराम’ नाटकाचे प्रयोग झाल्यानंतर प्रचंड गदारोळ माजला आणि घाशीराम व नाना फडणवीसांची भूमिका केलेले अनुक्रमे रमेश टिळेकर व मोहन आगाशे यांना त्यानंतर त्याच भूमिकांवरुन लोक ओळखायला लागले. त्यांना आगामी काळात वेगळी भूमिकाच मिळेनाशी झाली. त्यामुळे जोशी यांनी घाशीराम साकारला असता तर जोशी व घाशीराम हेच समीकरण होऊन त्यांना पुढे त्रास झाला असता. त्यामुळे जोशींना भूमिका मिळाली नाही हे चांगलेच झाले. असे डॉ.पटेल यांनी सांगितली.