शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
2
नाईट क्लब आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना दिल्लीत आणले; थायलंडला पळून गेले होते
3
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! मार्च २०२६ पूर्वी मिळणार मोठं गिफ्ट, सरकारनं दिली महत्त्वाची माहिती
4
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉसह सरफराज खानला कुणीच दिला नाही भाव; सलग दुसऱ्यांदा 'अनसोल्ड'चा ठपका
5
सेकंदात तयार होणारी मॅगी कॅप्सूल खरी की खोटी? ४० मिलियन लोकांनी बघितलेल्या व्हिडीओचं सत्य काय?
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या लोकांनी पायात काळा धागा बांधू नये; होतो दुष्परिणाम!
7
क्रीडा मंत्री माणिकराव कोकटे यांना कुठल्याही क्षणी अटक होणार?; जिल्हा कोर्टाने सुनावला निकाल
8
IPL 2026 Auction : कॅमरुन ग्रीनसह BCCI ही मालामाल! ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लागली रेकॉर्ड ब्रेकिंग बोली
9
रिअलमीचा धमाका! ७०००mAh बॅटरीसह Realme Narzo 90 सिरीज भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत
10
हायड्रोजन कारची जगातील पहिली क्रॅश टेस्ट झाली; ह्युंदाई नेक्सो किती आहे सुरक्षित...
11
"ज्यांनी तुम्हाला हिंदुत्व शिकवलं त्या बाळासाहेबांच्या कुटुंबाला..."; बाळा नांदगावकरांचा टोला
12
"मुंबईचे मारेकरी कोण? राजकीय स्वार्थासाठी मराठी माणसाला वापरले"; भाजपाचा ठाकरेंना टोला
13
निर्मला सीतारामन यांचं एक वक्तव्य आणि 'या' शेअर्सना लागले पंख; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
15
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
16
Chandrapur Farmer : किडनी वीक पण कर्ज फेड ! सावकाराच्या सांगण्यावरून शेतकऱ्याने ८ लाखांना विकली किडनी; कंबोडियात जाऊन केले ऑपेरेशन
17
निवडणुका जाहीर होताच उद्धवसेनेला धक्का; माजी नगरसेवकांचा जय महाराष्ट्र, शिंदे गटात प्रवेश
18
धक्कादायक! ७ वर्षांच्या मुलीचा तिसऱ्या मजल्यावरून पडून संशयास्पद मृत्यू, आईनेच खाली फेकल्याचा संशय  
19
“२०२९ मध्ये भाजपा विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र दिसेल, राक्षसी महत्त्वाकांक्षा...”: रोहित पवार
20
IPL 2026 Auction : लिलावासाठी काव्या मारन नटली; सोशल मीडियावर तिच्या स्टायलिश Look ची चर्चा रंगली
Daily Top 2Weekly Top 5

निसर्ग संवर्धन मोठे आव्हान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 05:46 IST

औद्योगिकीकरण थांबवायला हवे. मेट्रो किंवा कोणताही प्रकल्प आता केला जाऊ शकत नाही. दरवर्षी तापमान वाढणार आहे. मानवजातीच्या उच्चाटनाची प्रक्रि या येत्या ४-५ वर्षांत पृथ्वीवर सुरू होणार आहे.

- गिरीश राऊतप्रदूषण हा जगभरात भेडसावणारा प्रश्न आहे. उद्योगधंदे वाढले, डोंगर पोखरले, सर्वत्र सिमेंटची घरे झाली, पावसाचे प्रमाणही कमी झाले, हवेत कार्बन वाढले, याचा परिणाम पर्यावरण ºहासात झाला. परिणामी, पर्यावरण संवर्धन हे मोठे आव्हान आहे. हिमस्खलनाची ही धोक्याची घंटा असून, आपण वेळेतच सावध होत पर्यावरण संवर्धनासाठी तत्परतेने पावले उचलली पाहिजेत, अन्यथा पृथ्वीचा विनाश होईल. २०२०मध्ये मानवजात वाचविण्यासाठी नियंत्रित करावयाच्या २ अंश वाढीची मर्यादा ओलांडली जाणार आहे. प्रत्येक वर्षी १/५ अंशाची वाढ पृथ्वीच्या सरासरी तापमानात होत असल्याने, मानवजात व जीवसृष्टी नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. परिणामी, पर्यावरणाचे संवर्धन करणे हे आपल्यासमोरील आव्हान आहे.नरिमन पॉइंट ते कांदिवलीपर्यंत २९.२२ किलोमीटर सागरी मार्ग म्हणजेच कोस्टल रोड बांधताना, पर्यावरणाची काळजी घेणे हे आपल्यासमोरचे आव्हान आहे. पर्यावरणाचा विचार करता, मुंबईच्या मातीची वैशिष्ट्ये लक्षात घेता, मुंबईतील मातीत रुजेल, वाढेल आणि अधिक घट्टपणे मूळ धरेल अशी झाडे लावणे गरजेचे आहे. तामण, बहावा, करंज, बकुळ, समुद्रफूल, कडुनिंब यासारखी झाडे लावली पाहिजेत, अशी झाडे लावणे आपल्यासाठी संधी आहे. गुलमोहर, सोनमोहर, पर्जन्य वृक्ष यासारखी झाडे लावणे शक्यतो टाळले पाहिजे.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या विकास आराखड्यात पर्यावरणाकडे संपूर्णत: दुर्लक्ष केले आहे. परिणामी, येथे पर्यावरणाचे संवर्धन करणे आपल्यासमोरील आव्हान आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने बांधण्यात येणाºया मुंबई ट्रान्स हार्बर लिंकदरम्यान पर्यावरणाची हानी होणार आहे. ही हानी रोखणे हे आव्हान आहे.(लेखक पर्यावरणतज्ज्ञ आहेत.)

टॅग्स :newsबातम्या