शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

नटराजन चंद्रशेखरन बनले टाटा सन्सचे अध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2017 20:56 IST

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक नटराजन चंद्रशेखरन यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 12 - टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक नटराजन चंद्रशेखरन यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे टाटा सन्सला पहिल्यांदाच पारशी नसलेला व्यक्ती अध्यक्ष म्हणून लाभला आहे. 53 वर्षीय चंद्रशेखरन हे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. टीसीएस 2009पासून भारतातील सर्वात मोठी आउटसोर्सर कंपनी आहे. सायरस मिस्त्रींनी ऑक्टोबरमध्ये राजीनामा दिल्यानंतर टाटा सन्सच्या संचालकपदी नटराजन चंद्रशेखरन यांची नियुक्ती करण्यात आली होती. याचदरम्यान टीसीएसचा तिसऱ्या तिमाहीतला नफा जाहीर झाला. त्यामध्ये टीसीएसने 6778 कोटींचा निव्वळ नफा मिळवला आहे. दरम्यान, टाटा सन्सचे मुख्यालय मुंबई हाऊस येथे आज संचालक मंडळाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत नटराजन चंद्रशेखरन यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यावर संचालक मंडळाचं एकमत झालं आणि नटराजन चंद्रशेखरन अध्यक्ष झाले.तत्पूर्वी चंद्रशेखरन यांच्या अध्यक्षतेखाली टीसीएसने प्रगती केली आहे. 2015-16मध्ये टीसीएसनं 16.5 डॉलर बिलियन महसूल मिळवला आहे. चंद्रशेखरन हे 1987ला टीसीएसमध्ये रुजू झाले. नटराजन यांनी तामिळनाडूच्या त्रिची या इंजिनीअरिंग कॉलेजमधून कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनमध्ये मास्टर्स केलं आहे. सायरस मिस्त्रींना हटवल्यानंतर तात्पुरते रतन टाटांना अध्यक्षपद सोपवण्यात आलं होतं आणि नव्या अध्यक्षाची निवड करण्यासाठी निवड समितीचीही स्थापना केली होती. या निवड समितीत रतन टाटा, वेनू श्रीनिवासन, अमित चंद्रा, रोनेन सेन, लॉर्ड कुमार भट्टाचार्य यांचा समावेश आहे. या निवड समितीनेच नटराजन चंद्रशेखरन यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.