शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

दाभोलकर हत्येप्रकरणी देशव्यापी आंदोलन

By admin | Updated: July 21, 2016 05:01 IST

‘हिंसेला नकार, मानवतेचा स्वीकार’ हे ब्रीद घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे देशभरात आंदोलन करण्यात येणार आहे.

पुणे : ‘हिंसेला नकार, मानवतेचा स्वीकार’ हे ब्रीद घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे देशभरात आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाला बुधवारी दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरुवात झाली असून, राज्यभरातील सर्व जिल्ह्यांंमध्ये हे आंदोलन २० आॅगस्टपर्यंत राबविण्यात येणार असल्याचे अ‍ॅड. मुक्ता दाभोलकर यांनी सांगितले. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला ३५ महिने पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे या हत्येचा निषेध करीत दाभोलकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. महर्षी शिंदे पुलावरील या कार्यक्रमाला दिग्दर्शक नागराज मंजुळे, अंनिसचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख, मुस्लिम सत्यशोधक समाजाचे शमसुद्दीन तांबोळी व कार्यकर्ते उपस्थित होते. मुक्ता दाभोलकर म्हणाल्या, की ३५ महिने होऊनही तपास यंत्रणा अतिशय संथगतीने काम करीत आहेत. हत्या आणि खून असे प्रकार केवळ पाकिस्तान आणि बांगलादेशात घडतात, असे वाटत होते. मात्र आपल्या देशातही या गोष्टी सर्रास होत असल्याचे चित्र आहे. स्त्रीला सन्मानाने वागण्याचीही मुभा राहिली नाही, हे कोपर्डीच्या प्रकरणावरून दिसून येते. आपला विरोध दर्शविण्यासाठी लोकशाहीमध्ये हिंसेचा मार्ग वापरणे हे अतिशय गैर आहे. या सर्व गोष्टींचा निषेध नोंदविण्यासाठी देशभरात सर्व जिल्ह्यांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे शाळा, महाविद्यालये व सरकारी कार्यालयांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी कोपर्डीमधील बलात्कार प्रकरणाचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. बलात्काऱ्यांना जात-पात, धर्म काहीही नसते. त्यांची विकृत मानसिकता हेच या गुन्ह्याचे मूळ कारण आहे. ही मानसिकता बदलायला हवी. अशा प्रकारच्या सर्व प्रकरणांमध्ये पोलीस आणि सीबीआयने योग्य पद्धतीने तपास करणे गरजेचे असल्याचे सांगितले.पावसाळी अधिवेशनात कोणत्याही राजकीय पक्षाने डॉ. दाभोलकरांच्या हत्येबाबत काहीही विषय काढला नाही, ही खेदाची बाब आहे. जागतिक पातळीवर हिंसेने थैमान घातले असताना अशा हत्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी एकत्रित लढा उभारावा लागेल, असे शमसुद्दीन तांबोळी यांनी सांगितले. या हत्येचा निषेध म्हणून पुढील एक महिना आपण केवळ एकच वेळ जेवण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मिलिंद देशमुख यांनीही विचार मांडले. (प्रतिनिधी)>सैैराट आता माझा नव्हे; जनतेचा !भारतीय जनता पक्षाच्या आमदार मनीषा चौैधरी यांनी ‘सैराट’मुळे तरुण बिघडत असल्याने या चित्रपटावर बंदी यावी, अशी मागणी नुकतीच केली होती. त्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना विचारले असता ते म्हणाले, की ‘सैराट’ आता माझा राहिला नाही, तो आता जनतेचा झाला आहे. कोणत्याही कलेवर अशाप्रकारे बंदी घालून काहीही साध्य होणार नाही.