शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचा जाहीरनामा : पालिकेच्या शाळा अद्ययावत करणार

By admin | Updated: February 16, 2017 18:36 IST

राष्ट्रवादीचा जाहीरनामा : पालिकेच्या शाळा अद्ययावत करणार

राष्ट्रवादीचा जाहीरनामा : पालिकेच्या शाळा अद्ययावत करणारसोलापूर आॅनलाईन लोकमतगेली तीन टर्म काँग्रेसबरोबर सत्तेत राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने यंदाच्या महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने जाहीरनामा प्रसिद्ध करताना त्याच-त्या आणि जुन्या प्रश्नांना स्पर्श केले आहे. डबघाईला आलेल्या मनपा शाळा मात्र अद्ययावत करून तळागाळातील मुला-मुलींना चांगले शिक्षण देण्याचे वचन मात्र या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. राष्ट्रवादी पक्षाचे निरीक्षक प्रदीप गारटकर, शहराध्यक्ष भारत जाधव यांनी काही प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सोमवारी जाहीरनामा प्रसिद्ध केला. एकूण २१ प्रश्न हाती घेत त्यांनी केलेल्या जाहीरनाम्यात नव्या योजनांचा कसलाच समावेश नाही. सध्या महापालिका आर्थिक संकटात आहे. मनपाशी संलग्नित परिवहन विभागही डबघाईला आला आहे. हा धागा पकडून महापालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे वचन पक्षाने जाहीरनाम्यात दिले आहे. सध्या शहरात पाणी प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे महापालिकेत आपली सत्ता आल्यास दररोज पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. खड्डेमय शहर आणि धूळमय शहर हा शहरावर बसलेला शिक्का पुसून टाकण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाने खड्डेमुक्त आणि धूळमुक्त शहर बनविण्याचा संकल्पही जाहीरनाम्यात सोडला आहे. त्याचबरोबर कचरामुक्त शहर, पार्किंग व्यवस्था, सक्षम आरोग्य सेवा, मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, सर्वत्र ड्रेनेज व जलवाहिनी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, निरोगी सोलापूर, उद्योगांना पायाभूत सुविधा, हॉकर्स झोनची अंमलबजावणी, हेरिटेज जतन आदी विषय मार्गी लावण्याचे अभिवचन जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. --------------------------सुलभ शौचालये अन् हिरव्यागार बागाआज सोलापूर शहराचा विस्तार वाढत चालला आहे. स्मार्ट सिटीच्या यादीत सोलापूरचा समावेश करण्यात आला आहे. असे असताना महिलांसाठी काही ठिकाणचा अपवाद वगळता कुठेच सुलभ शौचालये नाहीत. हा प्रश्न महिलांसाठी नेहमीच सतावणारा आहे. शहर राष्ट्रवादी काँग्रेसने हा विषय हाती घेऊन सुलभ शौचालये उभारण्याचा मनोदय जाहीरनाम्यात व्यक्त केला आहे. शिवाय शहरातील बागबगिच्यांची झालेली दुरवस्थाही दूर करुन हिरव्यागार बागा करण्याचे वचन जाहीरनाम्यात दिले आहे.