शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

‘महावितरण’तर्फे राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन

By admin | Updated: July 6, 2015 00:34 IST

बुधवारी प्रारंभ : कोल्हापूरला प्रथमच मान

कोल्हापूर : चाळिसाव्या अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या कबड्डी (पुरुष) स्पर्धेचे आयोजन ‘महावितरण’च्या कोल्हापूर विभागाच्या वतीने केले जाणार आहे. अशा प्रकारचा मान कोल्हापूर परिमंडळ विभागास प्रथमच मिळत आहे. या स्पर्धेत देशभरातील २२ वीज कंपन्यांमधील संघ सहभागी होणार असून, या स्पर्धा बुधवार (दि. ८) ते शनिवार (दि. ११) दरम्यान कोल्हापुरात होणार असल्याची माहिती मुख्य अभियंता शंकर शिंदे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. विद्युत मंडळातील कर्मचाऱ्यांच्या अंगभूत गुणांना वाव देण्यासाठी अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्यावतीने दरवर्षी देशातील वीज कंपन्या तसेच वीज मंडळांतर्गत वेगवेगळ्या क्रीडास्पर्धांचे आयोजन केले जाते. अशा प्रकारच्या स्पर्धा दरवर्षी वेगवेगळ्या राज्यांत घेतल्या जातात. यावर्षी ४०व्या अखिल भारतीय कबड्डी (पुरुष) स्पर्धा आयोजित करण्याचा मान यंदा महाराष्ट्र राज्यात महावितरणला मिळाला आहे. महावितरणच्यावतीने या स्पर्धा कोल्हापुरात घेतल्या जाणार आहेत. स्पर्धा बुधवार (दि. ८) ते शनिवार (दि. ११) दरम्यान घेतल्या जाणार असून, या स्पर्धेत देशातील २२ वीज कंपन्यांमधील संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन महावितरणचे कार्यकारी संचालक (एचआर) यांच्या हस्ते, तर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या उपस्थितीत मुस्कान लॉन येथे दि. ८ जुलै रोजी होणार आहे. स्पर्धा चार गटांत साखळी पद्धतीने खेळविली जाणार आहे. बक्षीस समारंभ महावितरणचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक ओमप्रकाश गुप्ता यांच्या हस्ते होणार असून, यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.पत्रकार परिषदेवेळी अधीक्षक अभियंता दीपक कुमठेकर, उपमहाव्यवस्थापक मोहन चव्हाण, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर, जनसंपर्क अधिकारी फुलसिंग राठोड, आदी उपस्थित होते. स्पर्धेचे यंदा ४0 वे वर्ष ---२२ संघ होणार सहभागी----शनिवारी समारोप