शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशांकडे ढुंकूनही पाहत नाही"; RSS वर बंदी घालण्याच्या खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस थेटच बोलले...
2
भारतीय कुटुंबे ३.८ ट्रिलियन डॉलर सोन्याचे 'मालक'; वाढणाऱ्या किमतीमुळे भरघोस 'रिटर्न'
3
"वादळांविरुद्ध लढण्यात एक वेगळीच मजा असते...", कोर्टाच्या निर्णयानंतर तेजस्वी यादवांची पहिली प्रतिक्रिया
4
मजुराला रस्त्याच्या कडेला सापडला एक दगड, घरी नेल्यावर कळलं की...; क्षणात आयुष्य बदलले!
5
दिवाळी धमाका! 'या' कंपनीची फ्लाइंग कनेक्शन्स सेल; फक्त २००० रुपयांमध्ये करा हवाई प्रवास
6
Bihar Election 2025: प्रशांत किशोर यांनी ६५ मतदारसंघात उघडले पत्ते; कोणाला उमदेवारी?
7
कोरोनाच्या संसर्गामुळे शुक्राणूंमध्ये झाला मोठा बदल, नव्या अपत्यांमध्ये चिंता वाढली
8
GMP देतोय संकेत, ₹१५५० च्या पार लिस्ट होऊ शकतो 'हा' IPO; पहिल्यांदा जीएमपी ₹४०० पार
9
Harshita Dave : रील बनवण्याची आवड पण स्वप्न मोठी; २२ व्या वर्षी झाली डेप्युटी कलेक्टर, तुम्हीही कराल कौतुक
10
बिग बींशी उद्धटपणे बोलला, त्यांच्यावर ओरडला! शेवटी अतिआत्मविश्वास नडला, आगाऊ इशितची ५व्या प्रश्नावरच उडाली विकेट
11
खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल
12
वेस्ट इंडीजची टीम इंडियाला कडवी टक्कर; तब्बल १२ वर्षानंतर पाहावा लागला 'लाजिरवाणा' दिवस!
13
फक्त २५,००० रुपये पगारात ईपीएफमध्ये १ कोटींचा फंड शक्य आहे! गुंतवणुकीचं गणित समजून घ्या
14
IND vs WI : दोन शतकवीरांसह शेपटीनं दमवलं! टीम इंडियावर चौथ्यांदा आली ही वेळ
15
दिवाळीत Kia च्या कार्सवर मिळतोय बंपर डिस्काऊंट, कंपनीनं आणल्या अनेक ऑफर्स; कोणत्या कारवर किती बचत?
16
भगवी वस्त्रे काढून फेकली, बुरखा घालून पळाली; हत्याकांडाची मास्टरमाईंड पूजा पांडे कुठे लपली होती?
17
सोनं, घर आणि... अनुपम मित्तल यांनी सांगितला श्रीमंतीचा कानमंत्र; म्हणाले तुम्हीही होऊ शकता अब्जाधीश
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 'दिवाळी जॅकपॉट'! महागाई भत्त्यात ३% ने वाढ; पाहा कोणाचा पगार किती वाढणार?
19
खंबीर साथ! बायकोला वर्ल्ड चॅम्पियन करण्यासाठी नवऱ्याने सर्वस्व पणाला लावलं, स्वप्न सत्यात उतरवलं
20
Ranji Trophy: बिग सरप्राइज! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर उप-कर्णधारपदाची जबाबदारी

हिंदू संस्कृतीतून राष्ट्र शक्तिशाली होईल

By admin | Updated: January 12, 2015 03:55 IST

हिंदू संस्कृतीमध्ये राष्ट्र शक्तिशाली करण्याची ताकद आहे. मात्र ही ताकद हजारो वर्षांच्या भेदपरंपरेला उपटून टाकल्यानंतर निर्माण होईल.

औरंगाबाद (छत्रपती संभाजी महाराज नगरी ) : हिंदू संस्कृतीमध्ये राष्ट्र शक्तिशाली करण्याची ताकद आहे. मात्र ही ताकद हजारो वर्षांच्या भेदपरंपरेला उपटून टाकल्यानंतर निर्माण होईल. ‘स्वान्त सुखाय, बहुजन हिताय’ याप्रमाणे काम करावे लागणार आहे. सर्व भेदांना नष्ट करणाऱ्या राष्ट्राला पुनर्वैभव प्राप्त करून देणाऱ्या समाजनिर्मितीचे काम संघाला करावे लागणार आहे. त्यासाठी स्वयंसेवकांनी तन, मन, धनाने नि:स्वार्थीपणाने राष्ट्रवैभव प्राप्तीसाठी काम करावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी रविवारी येथे केले.संघाची व्याप्ती वाढविण्यासाठी हिंदुत्व वाढविण्यासोबत बहुजनांनादेखील सोबत घेण्याचा मंत्र डॉ. भागवत यांनी यावेळी दिला. हजारो वर्षांची भेदपरंपरा संपवून सनातन मूल्यांचा विचारही त्यांनी मांडला. हिंदू संस्कृती, अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाचा राष्ट्रीय स्वयंसेवकांचा महासंगम रविवारी येथे बीड बायपास रोडवरील छत्रपती संभाजी महाराज नगरीत पार पडला. देवगिरी प्रांतातील ११ जिल्ह्यांतील ४१ हजार २०० हून अधिक स्वयंसेवकांनी या महासंगमात राष्ट्र शक्तिशाली बनविण्यासाठी लागणारी ज्ञानरूपी ऊर्जा मिळवली. डॉ. भागवत म्हणाले, की या देशाचा पुत्र भारतमातेवर श्रद्धा ठेवणारा, संस्कृतीच्या मूल्यांआधारे जीवन जगणारा, पूर्वजांचा गौरव मनात ठेवणारा हिंदू आहे. येथे पूजेचा प्रश्नच येत नाही. येथे हिंदूंना पूजा बदलण्याच्या निमित्ताने त्याला बाहेर काढून ‘तू चूक, आम्हीच खरे’ या उदात्त विचाराने आपले गेलेले लोक परत आणण्याचा प्रयत्न केला जातो. संस्कृती म्हणजे पुस्तकातील व्याख्या नाही. संस्कृती जगून दाखविण्याचे काम संघाला सर्व समाजाला घेऊन करावे लागेल. स्वत:ला हिंदू म्हणवून घेणाऱ्यांची मंदिरे, पाणवठे, स्मशानभूमी वेगवेगळ्या आहेत. हे सर्व काही बदलावे लागणार आहे. हे राष्ट्र सार्वभौम आहे. त्यासाठी संघाचे काम वाढत आहे. वाढत जाणार आहे. विरोधकांना संघ खटाटोप करतो, शक्तिप्रदर्शन करतो, असे वाटत असले तरी संघ असे करतो हे स्वयंसेवकांसह नागरिकांनी जाणून घेतले पाहिजे. आजच्या जगरहाटीमध्ये संघाचा प्रभाव जीवनात आणण्यापलीकडे मोठे लक्ष्य असल्याचे डॉ़ भागवत म्हणाले़ नियोजनबद्ध आखणीमुळे पाऊण लाख नागरिक असतानाही कुठे गर्दी, गोंधळ झाला नाही. (प्रतिनिधी)पोळ्यांनी जोडली १५ हजार कुटुंबे > राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महासंगम सोहळ्यासाठी ६०० स्वयंसेवकांनी २ लाख पोळ्या संकलन करून शहरातील १५ हजार कुटुंबांना थेट संघाच्या कार्यात सहभागी करून घेतले. ‘पोळी संकलन’ हे प्रभावी माध्यम होऊ शकते, असा संदेश यातून देण्यात आला.> १०० एकर परिसरात आयोजित महासंगमावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी ड्रोनचा वापर केला. या ड्रोनला उच्च दर्जाचा कॅमेरा बसविला होता. याद्वारे प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जात होती. रिमोटच्या साह्याने ड्रोनला सर्वत्र फिरविले जात होते. पोलिसांना एका ठिकाणी बसून कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर चोहोबाजूच्या हालचालींवर लक्ष ठेवता आले.