शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या विद्यार्थ्याला फेसबुककडून दहा हजार डॉलर

By admin | Updated: May 16, 2017 02:05 IST

पेठ : कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर सामान्य कुटुंबातील विद्यार्थीही असामान्य कर्तृत्व सिद्ध करू शकतात याचेच ज्वलंत उदाहरण जयेश अहिरे या विद्यार्थ्याने दाखवून दिले आहे.

 

रामदास शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्कपेठ : कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर सामान्य कुटुंबातील विद्यार्थीही असामान्य कर्तृत्व सिद्ध करू शकतात याचेच ज्वलंत उदाहरण नाशिक येथील जयेश अहिरे या विद्यार्थ्याने दाखवून दिले आहे. जयेश आहिरे सध्या जगभर गाजत असून, कंपनीत काम करणाऱ्या कामगाराच्या मुलाला फेसबुकने तब्बल दहा हजार डॉलरचे (६ लाख ५० हजार रुपये) बक्षीस प्रदान केले आहे.फेसबुकसह इतर सर्वच सोशल मीडिया साइटमध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी असतात. त्यामुळे या साइटचा वापर करणाऱ्या खातेदारांचा डाटा असुरक्षित होऊ शकतो. अशाच प्रकारची फेसबुकमध्ये राहून गेलेली त्रुटी मूळच्या नाशिकच्या व सध्या पुणे येथे अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या जयेश बापू अहिरे या विद्यार्थ्याने शोधून काढली. एखाद्याने फेसबुकवर अपलोड केलेला एखादा फोटो वापर करणाऱ्याची परवानगी न घेता दुसऱ्याला बदलता किंवा काढून टाकता येऊ शकत होता. अशा प्रकारची त्रुटी शोधून काढल्यानंतर जयेशने ईमेलद्वारे फेसबुकला ही बाब निदर्शनास आणून दिली. प्रारंभी जयेशचे म्हणणे कंपनीने फारसे मनावर न घेतल्याने त्याने फेसबुकच्या टेस्टिंग प्रोफाइलमध्ये बदल करून त्याचे सविस्तर छायाचित्रण कंपनीला सादर केले. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या फेसबुकने जयेशशी संपर्क साधून सदर त्रुटीबाबत अधिक माहिती जाणून घेतली. कंपनीला खात्री पटल्यानंतर जयेशला तब्बल दहा हजार डॉलरचे (भारतीय चलनात ६ लाख ५० हजारांचे) बक्षीस प्रदान केले. जयेशचे वडील बापू सुकदेव अहिरे हे नाशिकच्या एका खासगी कंपनीत कामगार असून, आई विद्या या शिवणकाम करून मुलांचे शिक्षण व कुटुंबाच्या खर्चाला हातभार लावतात. जयेश सध्या सिंहगड महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असून, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जयेशने आपले शिक्षण घेतले आहे. अतिशय कमी वयात मिळालेल्या या बक्षिसाचे श्रेय तो आपल्या आई-वडिलांना देतो.