शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

नाशिक परीक्षेत्रिय पोलीस क्रीडा स्पर्धेत नाशिक ग्रामीणला सांघिक विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 21:38 IST

शहर पोलीस आयुक्तालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या ३० व्या परीक्षेत्रिय पोलीस क्रीडा स्पर्धेत पुरुष गटाचे सांघिक विजेतेपद नाशिक ग्रामीण तर महिला गटात नाशिक शहर संघाने मिळविले़ या स्पर्धेत पहिल्या दिवसापासूनच नाशिक ग्रामीणने वर्चस्व प्रस्थापित केले होते़ सर्वोत्कृष्ठ खेळाडू म्हणून नाशिक ग्रामीणचे सावळीराम शिंदे तर महिलांमध्ये अहमदनगरची मनिषा निमानकर यांना गौरविण्यात आले़ गत आठ दिवसांपासून सुरू असलेल्या या स्पर्धांचा शानदार समारोप बक्षीस वितरणाने झाला़

ठळक मुद्देनाशिक परीक्षेत्रिय पोलीस क्रीडा स्पर्धा पुरुष गटाचे सांघिक विजेतेपद नाशिक ग्रामीण महिला गटाचे सांघिक विजेतेपद नाशिक शहर

नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या ३० व्या परीक्षेत्रिय पोलीस क्रीडा स्पर्धेत पुरुष गटाचे सांघिक विजेतेपद नाशिक ग्रामीण तर महिला गटात नाशिक शहर संघाने मिळविले़ या स्पर्धेत पहिल्या दिवसापासूनच नाशिक ग्रामीणने वर्चस्व प्रस्थापित केले होते़ सर्वोत्कृष्ठ खेळाडू म्हणून नाशिक ग्रामीणचे सावळीराम शिंदे तर महिलांमध्ये अहमदनगरची मनिषा निमानकर यांना गौरविण्यात आले़ गत आठ दिवसांपासून सुरू असलेल्या या स्पर्धांचा शानदार समारोप बक्षीस वितरणाने झाला़ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ई वायुनंदन, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त डॉ़रविंद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते विजेत्यांना परितोषिके देऊन सत्कार करण्यात आला़

कुलगुरु वायुनंदन यांनी यावेळी सांगितल की, माध्यमांमध्ये पोलिसांच्या चांगल्या कामगिरीऐवजी नकारात्मक बातम्याच अधिक येतात़ पोलिसांवर कामाचा अतिरिक्त ताण असूनही त्यांच्यासारखा उत्साह कोठेही बघावयास मिळत नाही़ त्याच्यातील ही उर्जा अशीच कायम ठेवण्यासाठी क्रीडा स्पर्धा या उपयुक्त ठरतात़ मुक्त विद्यापीठाने पोलीसांसाठी विविध अभ्यासक्रम तयार केले असून त्याबाबत पोलीस प्रशासनाबरोबरच करारही झाला आहे़ या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याचे आवाहन वायुनंदन यांनी केले़ विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेत खेळाडूंनी चांगली कामगिरी केली असून मुंबईमध्ये जानेवारीमध्ये होणाºया राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धांमध्ये आणखी चांगली कामगिरी करून परिक्षेत्राचे नाव मोठे करण्याचे आवाहन केले़

पोलीस दलातील प्रत्येक कर्मचाºयाने किमान एक तरी खेळ खेळायला हवा़ यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य तर सुधारतेच शिवाय कामातील उत्साहही कायम राहत असल्याचे पोलीस आयुक्त डॉ़रविंद्रकुमार सिंगल यांनी प्रास्तविकात सांगितले़ यावेळी खेळाडूंनी केलेले शानदार संचलन, धुळे येथील राज्य राखीव पोलीस दलाने सादर केलेले बांबू नृत्य व त्याद्वारे दिलेला ‘वृक्ष लावा, वृक्ष वाढवा’चे सामाजिक संदेश तसेच नंदूरबार पोलिसांनी सादर केलेले आदीवासी नृत्य यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते़ आदिवासी नृत्यामध्ये तर पोलीस अधिकाºयांच्या पत्नींनीही ठेका धरला होता़

या समारोप समारंभास नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संजय दराडे, अहमदनगरचे अधीक्षक रंंजनकुमार शर्मा, धुळ्याचे अधीक्षक एम. रामकुमार, जळगावचे अधीक्षक दत्तात्रय कराळे, नंदुरबारचे संजय पाटील, उपायुक्त विजयकुमार मगर, श्रीकृष्ण कोकाटे, लक्ष्मीकांत पाटील, माधुरी कांगणे आदींसह सहायक पोलीस आयुक्त, वरीष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते.स्पर्धेचा अंतिम निकाल (विजेता- उपविजेता)

* फुटबॉल : जळगाव, नशिक ग्रामीण.* हॉकी : नाशिक शहर, जळगाव.* व्हॉलीबॉल (पुरुष) : जळगाव, नंदुरबार.* व्हॉलीबॉल (महिला): नाशिक शहर, जळगाव.* बास्केट बॉल (पुरूष): नाशिक शहर, अहमदनगर.* बास्केट बॉल (महिला): नाशिक शहर, नाशिक ग्रामीण.*हॅण्डबॉल : नाशिक शहर, नंदुरबार.* कबड्डी (पुरुष) : नाशिक ग्रामीण, जळगाव.* कबड्डी (महिला): नाशिक ग्रामिण, जळगाव.* खो खो (पुरुष): अहमदनगर, नाशिक ग्रामिण.* खो खो (महिला): धुळे, नाशिक ग्रामिण.* जलतरण : नाशिक ग्रामीण.* कुस्ती (पुरुष): नाशिक ग्रामिण.* कुस्ती (महिला): नाशिक शहर* ज्युदो (पुरुष) : नाशिक ग्रामिण.* ज्युदो (महिला) : नाशिक ग्रामिण.* बॉक्सिंग (पुरुष) : नाशिक ग्रामिण.* बॉक्सिंग (महिला) : नाशिक शहर.* वेटलिफ्टींग (पुरुष) : नाशिक ग्रामिण.* वेटलिफ्टींग (महिला): नाशिक शहर.* अ‍ॅथेलेटिक्स (पुरुष) : नाशिक ग्रामिण.* अ‍ॅथेलेटिक्स (महिला) : नाशिक ग्रामिण.* ४ बाय ४००रिले(महिला): नाशिक ग्रामिण, नाशिक शहर, जळगाव.* ४ बाय ४०० रिले (पुरूष): जळगाव, नशिक शहर, नंदुरबार

वैयक्तीक र्स्पेधेर्तील विजेते* २४ किलोमीटर मॅरेथॉन : प्रथम- सावळीराम शिंदे (नाशिक ग्रामीण), द्वितीय- संजय आहेर (नाशिक ग्रामीण).* १५०० मिटर धावणे (महिला): प्रथम - योगिता वाघ (नाशिक ग्रामीण), द्वितीय - पुनम खानदेशी (नंदुरबार), तृतीय - प्रतिभा खैरे (जळगाव).दोन खेळाडूंचे नवे विक्रमपरिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेत हातोडा फेक या प्रकारात दोन खेळाडूंनी पोलीस स्पर्धांमधील पुर्वीचे ४६ मीटरचे विक्रम मोडून नवीन विक्रम प्रस्थापित केले़ नंदुरबारच्या भुषण साहेबराव चित्ते यांनी ४७.३१ मिटर हातोडा फेकुन नवा विक्रम केला तर नंदुरबारच्याच हेमंत बारी यांनी ४८ मीटर हातोडा फेकत नवा विक्रम प्रस्थापीत केला़