शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सदोष मनुष्यवधाखाली पतीस सक्तमजुरीची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 23:16 IST

नाशिक : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीस बेदम मारहाण केल्यानंतर जखमी पत्नीस उपचारासाठी दाखल न करता तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारा व मृतदेह शिवाजीनगरला भावाच्या घरी टाकून पळ काढणारा पती रूपेश तुळशीराम गायकवाड (रा़मोरेमळा, पंचवटी) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश यू़ एम़ नंदेश्वर यांनी मंगळवारी (दि़१२) दहा वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये ...

ठळक मुद्देचारित्र्याच्या संशयावरून पत्नीस बेदम मारहाणदहा वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडसदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

नाशिक : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीस बेदम मारहाण केल्यानंतर जखमी पत्नीस उपचारासाठी दाखल न करता तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारा व मृतदेह शिवाजीनगरला भावाच्या घरी टाकून पळ काढणारा पती रूपेश तुळशीराम गायकवाड (रा़मोरेमळा, पंचवटी) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश यू़ एम़ नंदेश्वर यांनी मंगळवारी (दि़१२) दहा वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली़ सरकारी वकील पौर्णिमा नाईक यांनी या खटल्यात १७ साक्षीदार तपासले, तर सातपूर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक योगेश देवरे यांनी या गुन्ह्याचा तपास केला़पंचवटीतील मोरे मळ्यात रूपेश गायकवाड हा पत्नी मंगल व मुलगा उमेशसह राहत होता़ मद्याचे व्यसन असलेल्या रुपेशने ७ आॅगस्ट २०१४ रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन बेदम मारहाण केली तसेच तिचे डोके भिंतीवर आदळून जखमी केले़ तसेच पत्नीला उपचारासाठी दवाखान्यात दाखल न नेल्याने सकाळी तिचा मृत्यू झाला़ यानंतर पत्नीचा मृतदेह रिक्षातून आपला सख्ख्याभाऊ राहत असलेल्या सातपूर शिवाजीनगरमधील गणराज बिल्डिंगमध्ये ठेवून फरार झाला़याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात खून तसेच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक योगेश देवरे यांनी केला, तर न्यायालयात सरकारी वकील पौर्णिमा नाईक यांनी १७ साक्षीदार तपासले़ विशेष म्हणजे या खटल्यात आरोपीचा मुलगा उमेश याने आपली साक्ष फिरवली मात्र वैद्यकीय अधिकारी, रिक्षाचालक व परिस्थितीजन्य पुरावे यानुसार रूपेश गायकवाड यास दोषी धरून सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़