शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

दृष्टीआड नाशिकची ‘रामसृष्टी’

By admin | Updated: August 16, 2016 01:33 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ‘महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गोदापार्कबाबत नेहमीच वाद होत असताना एकेकाळी भाजपाचा महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या रामसृष्टीचीही

- संंजय पाठक, नाशिक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ‘महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गोदापार्कबाबत नेहमीच वाद होत असताना एकेकाळी भाजपाचा महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या रामसृष्टीचीही अवस्था बिकट असून, नुकत्याच झालेल्या महापुरामुळे तर दृष्टीआड रामसृष्टी अशी अवस्था झाली आहे.एखाद्या प्रकल्पाला विशिष्ट पक्ष अथवा व्यक्तीचे नाव जोडले गेल्यानंतर अर्थातच त्याची जबाबदारी संबंधितांची असते, प्रत्यक्षात तसे होत नाही. गोदापार्कचा नवा प्रकल्प गेल्या आठवड्यात आलेल्या पुरामुळे होत्याचा नव्हता झाला. तथापि, नाशिकमध्ये राजकीय अभिनिवेशातून अशाच प्रकारे भाजपाने रामसृष्टी उभारण्याचा केलेला खटाटोप पुरता वाया गेला आहे. नाशिक महापालिकेच्या १९९७च्या निवडणुकीच्या वेळी भाजपाने सत्ता आल्यास रामसृष्टी साकारण्याची घोषणा केली होती. ‘रामायण’ मालिकेचे निर्माते रामानंद सागर यांची भेट घेऊन संकल्पना राबविण्याचे ठरले. नाशिक प्रभू रामचंद्रांचे पदस्पर्श लाभलेली भूमी असल्याने पाऊलखुणा जपण्यासाठी रामसृष्टी साकारण्याचा मनोदय व्यक्त झाला. रामसृष्टीमध्ये रामाचे जीवनचरित्र रेखाटण्याबरोबरच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ‘लाइट अ‍ॅन्ड साउंड शो’च्या माध्यमातून हे चरित्र मांडण्याचे ठरविण्यात आले, परंतु त्याला आकार मिळाला नाही. २००५ मध्ये केंद्र शासनाने नेहरू अभियान राबविले तेव्हा गोदाकाठ सुशोभिकरण योजनेंतर्गत रामसृष्टीचा समावेश करण्यात आला. २०११ मध्ये तपोवनात लक्ष्मीनारायण पुलाखाली सुमारे सात एकर जागेत उद्यान साकारण्यात आले आणि त्यात पॅगोडा तसेच हॉल साकारण्यात आला. यात राम जीवनावरील सुमारे १३ म्युरल्स लावण्यात आले आहेत. तीन कोटी रुपये या प्रकल्पावर खर्च करण्यात आले, परंतु जी अवस्था गोदापार्कची तीच रामसृष्टीचीही झाली आहे. गोदावरी नदीच्या किनाऱ्यावरच साकारलेल्या रामसृष्टीत पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान होते. गेल्या आठवड्यात गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे गोदापार्कबरोबरच रामसृष्टीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यात सत्ता असूनही...राज्यात भाजपाची सत्ता तर आहेच, शिवाय नाशिक शहरात चारपैकी तीन आमदार भाजपाचेच आहेत. कुंभमेळ्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले, त्या वेळी रामसृष्टीच्या पुनर्निर्माणाची मोठी संधी होती, परंतु भाजपाच्या लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने या प्रकल्पाची रया गेली आहे.