शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
3
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
4
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
5
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
6
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
7
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
8
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
9
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
10
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
11
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
12
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
13
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
14
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
15
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
16
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
17
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
18
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
19
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
20
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश

आता़...पोलिसांकडे करा तक्रार आॅनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 17:12 IST

नाशिक : महाराष्ट्र पोलीस दलाने सुरू केलेल्या सिटीझन पोर्टलद्वारे नागरिकांना पोलिसांकडे आॅनलाईन तक्रार दाखल करता येणार असून त्यांच्या पोलीस ठाण्यातील चकरा कमी होणार आहेत़ विशेष म्हणजे तक्रारीबाबत पोलिसांनी काय कार्यवाही केली याची माहिती संबंधित नागरिकाच्या मोबाईलवर संदेशाद्वारे दिली जाणार असून दखलपात्र गुन्हा असेल तर त्वरीत एफआयआर दाखल केली जाईल़ विशेष ...

ठळक मुद्देपोलीस ठाण्यातील चकरा होणार कमी ; संकेतस्थळावर २३प्रकारच्या सुविधा पोलिस कार्यवाहीची माहिती संबंधित नागरिकाच्या मोबाईलवरदखलपात्र गुन्हा असेल तर फिर्याद दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात जावे लागणार

नाशिक : महाराष्ट्र पोलीस दलाने सुरू केलेल्या सिटीझन पोर्टलद्वारे नागरिकांना पोलिसांकडे आॅनलाईन तक्रार दाखल करता येणार असून त्यांच्या पोलीस ठाण्यातील चकरा कमी होणार आहेत़ विशेष म्हणजे तक्रारीबाबत पोलिसांनी काय कार्यवाही केली याची माहिती संबंधित नागरिकाच्या मोबाईलवर संदेशाद्वारे दिली जाणार असून दखलपात्र गुन्हा असेल तर त्वरीत एफआयआर दाखल केली जाईल़ विशेष म्हणजे याच पोर्टलवर राज्यातील कोणत्याही पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा (एफआयआर), हरविलेल्या व्यक्ती, अनोळखी मृतदेह यांची माहिती नागरिकांना एका क्लिकवर उपलब्ध असल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंघल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले़नाशिक पोलीस आयुक्तालयात संजीवकुमार सिंघल यांच्या हस्ते महाराष्ट पोलीस दलाच्या ई- पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले़ त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, www.mhpolice.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर महाराष्ट्र पोलिस दलातर्फे नागरिकांसाठी २३ विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत़ यापैकी नऊ सुविधांसाठी लॉग ईन आयडी/पासवर्डची आवश्यकता नसून उर्वरीत १३ सुविधांसाठी रजिस्टेशन करून लॉगईन आयडी व पासवर्डची आवश्यकता असणार आहे़ या पोर्टलद्वारे गणपती वा नवरात्रौत्सवाची परवानगीसाठी मंडळांना आॅनलाईन अर्ज करता येणार आहे़राष्ट्रीय सुरक्षा, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे संवेदनशील गुन्हे वा महिलांच्या संदर्भातील गुन्ह्यांची (विनयभंग, बलात्कार) माहिती मात्र या पोर्टलद्वारे मिळणार नाही़ तसेच यापैकी दाखल कोणते गुन्हे पोर्टलवर टाकण्याचे अधिकार पोलिसांना असणार आहे़ या पोर्टलमुळे पोलिसांचे काम वाढणार असले तरी नागरिकांना सुविधा मिळणार असून ही काळाची गरज आहे़ नागरिकांना आपल्या मोबाईलवरून तक्रार करता येणार असली तरी दखलपात्र गुन्हा असेल तर त्याची फि र्याद दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात जावेच लागणार आहे़ पोर्टलप्रमाणेच अ‍ॅप तयार करण्याचेही काम सुरू असून नागरिकांना अवैध धंद्यांबाबत माहिती द्यायची असेल व नाव गुप्त ठेवायचे असेल तर त्याची व्यवस्थाही या पोर्टलमध्ये आहे़पोलीस दलाच्या या ई- पोर्टलची उपयोगीता व महत्त्व हे पोर्टलचा वापर करणारे नागरिक व त्याची दखल घेणारे पोलीस अशा दोहोंवर अवलंबून असल्याचे संजीवकुमार सिंघल यांनी सांगितले़ यावेळी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संजय दराडे, गुन्हे शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगर, परिमंडल दोनचे उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे आदींसह सहायक पोलीस आयुक्त व वरीष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते.