शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

नाशिक ग्रामीणमधील किटकनाशकांची दुकाने फोडणाºया टोळीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 17:08 IST

नाशिक : ग्रामीण भागातील किटकनाशके व औषधविक्रीचे दुकाने फोडून चोरी करणाºया टोळीचा ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून नऊ संशयितांना अटक केली आहे़ या संशयितांनी ११ घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांच्याकडून शेतीउपयुक्त औषधे, किटकनाशके, तवेरा कार, छोटा हत्ती वाहन, दुचाकी असा १३ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त ...

ठळक मुद्देग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी साडेतेरा लाखांचा मुद्देमाल जप्त नऊ संशयितांना अटक

नाशिक : ग्रामीण भागातील किटकनाशके व औषधविक्रीचे दुकाने फोडून चोरी करणाºया टोळीचा ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून नऊ संशयितांना अटक केली आहे़ या संशयितांनी ११ घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांच्याकडून शेतीउपयुक्त औषधे, किटकनाशके, तवेरा कार, छोटा हत्ती वाहन, दुचाकी असा १३ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी दिली आहे़नाशिक ग्रामीणमधील निफाड, पिंपळगाव बसवंत, दिंडोरी, वणी, वडनेर भैरव, चांदवड, ओझर या ठिकाणची पेस्टीसाईडची दुकाने रात्रीच्या सुमारास फोडून किटकनाशकांची चोरी करण्याच्या घटना वाढल्या होत्या़ अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांनी या गुन्ह्यांसाठी विशेष पथकाची निर्मिती केली होती़ या पथकाने चोरीस गेलेल्या किटकनाशकांची कंपनी, वापर होणार परिसर याची सविस्तर माहिती गोळा करण्यास सुरूवात केली होती़

पोलीस निरीक्षक करपे यांना सोमवारी (दि़२) दिंडोरी तालुक्यातील सिंदवड येथील काही तरूण कमी किमतीत किटकनाशकांची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने रात्रभर जागरण करून संशयित सोपान दिनकर बस्ते (२५, रा़सिंदवड, ता़दिंडोरी), राहुल भाऊसाहेब मोरे (२६, रा़सिंदवड, ता़दिंडोरी), सतिश अरुण मोरे (२४, राक़सबे सुकेणे, ता़निफाड, ह़मु़बहादुरी, ता़चांदवड), शुभम नामदेव गवे (१८, राख़तवड, ता़दिंडोरी, जि़नाशिक) या चौघांना अटक केली़ पोलिसांनी या चौघा संशयितांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी आपल्या पाच साथीदारांची नावे सांगून पिंपळगाव, दिंडोरी, वणी, वडनेर भैरव, निफाड, कसबे सुकेणे, मोहाडी या ठिकाणी किटकनाशकांची दुकाने फोडल्याची कबुली दिली़

पोलिसांनी चोरी करण्यासाठी वापरण्यात येणाºया तवेराचा चालक खंडेराव पोपट कडाळे (४०, रा़तिसगाव, ता़दिंडोरी), किरण अशोक गायकवाड (१८, रा़बहादुरी, ता़दिंडोरी), गुलाब निवृत्ती लांडे (२१, रा़सिंदवड, ता़दिंडोरी) यांना अटक केली असता त्यांनी चोरलेली किटकनाशके लहू शंकर बस्ते (४५, रा़सिंदवड, ता़दिंडोरी) व ज्ञानेश्वर मुरलीधर गणोरे (३०, राख़डक सुकेणे, ता़निफाड यांना कमी किमतीत विकल्याची कबुली दिली़ पोलिसांनी या नऊही संशयितांकडून चोरीची किटकनाशके व गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली वाहने जप्त केली आहे़सव्वा तेरा लाखांचा मुद्देमाल जप्तग्रामीण पोलिसांनी संशयितांकडून ७ लाख २९ हजार ५५९ रुपये किमतीची शेती उपयोगी किटकनाशके, गुन्ह्यात वापरलेली तवेरा (एमएच ०४, ईएच ४९६०), छोटा हत्ती वाहन (एमएच १५, सीके ८५५८), स्प्लेंडर दुचाकी (एमएच १५, डीडब्ल्यू ६४७१) असा १३ लाख २४ हजार ५५९ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे़स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरीसहायक पोलीस निरीक्षक राम करपे, पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र रणमाळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक रवि शिलावट, रामभाऊ मुंढे, पोलीस हवालदार दीपक अहिरे, हनुमंत महाले, पोलीस नाईक अमोल घुगे, जालिंदर खराटे, राजू सांगळे, पोलीस शिपाई सुशांत मरकड, हेमंत गिलबिले, मंगेश गोसावी, प्रदीप बहिरम, सचिन पिंगळ, संदीप लगड यांनी ही कामगिरी केली़बस्ते, मोरे मास्टरमार्इंड

सोपान बस्ते, व राहुल मोरे हे घरफोडीतील मास्टरमार्इंड असून त्यांनी चोरीसाठी टोळीच तयार केली आहे़ गत काही वर्षांमधील ११ घरफोड्यांची त्यांनी कबुली दिली असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे़- संजय दराडे, ग्रामीण पोलीस अधीक्षक,नाशिक