शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

विवाहास नकार दिल्याचा रागातून तरुणीचा निर्घृण खून करणाºया आरोपीस जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 19:42 IST

जिल्हा न्यायालय : विवाहास नकार दिल्याचा राग; शरीरावर अठरा वारलोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : विवाहास नकार दिल्याचा रागातून उच्चशिक्षित तरुणीवर कटरने वार करून तिचा निर्घृण खून करणारा आरोपी शशिकांत शांताराम टावरे (२६, रा़ पळसे, ता़ जि़ नाशिक) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश यू़ एम़ नंदेश्वर यांनी मंगळवारी (दि़२६) जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ ...

ठळक मुद्देनाशिक जिल्हा न्यायालय ; तरुणीच्या शरीरावर अठरा वारपळसे येथील संत आईसाहेब विद्यालयातील रूम नंबर चारमध्ये बोलावून केले वारस्वत:च्या हाताच्या नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप, पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने सक्तमजुरी

जिल्हा न्यायालय : विवाहास नकार दिल्याचा राग; शरीरावर अठरा वारलोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : विवाहास नकार दिल्याचा रागातून उच्चशिक्षित तरुणीवर कटरने वार करून तिचा निर्घृण खून करणारा आरोपी शशिकांत शांताराम टावरे (२६, रा़ पळसे, ता़ जि़ नाशिक) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश यू़ एम़ नंदेश्वर यांनी मंगळवारी (दि़२६) जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ १८ मे २०१६ रोजी रात्रीच्या सुमारास पळसे येथील शाळेत युवतीच्या खुनाची घटना घडली होती़ या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील गायत्री पटनाला यांनी या खटल्याचे काम पाहिले़पळसे येथील आरोपी शशिकांत टावरे व तेथीलच एमबीए झालेली ज्योती सुदाम थेटे यांच्यात मैत्री होती़ मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर २८ जानेवारी २०१६ रोजी त्यांनी विवाह नोंदणी कार्यालयात विवाहासाठी अर्जही केला होता़ मात्र, ज्योतीच्या मोठ्या बहिणीचा विवाह होणे बाकी असल्याने घरच्यांनी समजावल्यानंतर ३ फेब्रुवारीला नोंदणीचा अर्ज तूर्तास मागे घेतला होता़ या गोष्टीचा राग आलेल्या शशिकांत याने १८ मे २०१६ रोजी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास ज्योतीला तिच्या घराच्या पाठीमागील संत आईसाहेब विद्यालयातील रूम नंबर चारमध्ये बोलावून घेतले आणि कटरने अठरा वार करून तिचा खून केला़ यानंतर स्वत:च्या हाताच्या नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला़या प्रकरणी कुसुम थेटे यांच्या फिर्यादीवरून १९ मे रोजी नाशिकरोड पोलीस ठाण्यात शशिकांत टावरे याच्या विरोधात खून व आत्महत्येचा प्रयत्न असे गुन्हे दाखल करण्यात आले होते़ न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी वकील गायत्री पटनाला यांनी १४ साक्षीदार तपासून आरोप सिद्ध केले तर बचाव पक्षाच्या वकिलांनी, शशिकांत व ज्योती यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा युक्तिवाद न्यायाधीशांनी फेटाळून लावला़न्यायाधीश नंदेश्वर यांनी फिर्यादी कुसुम थेटे, मयत ज्योतीची बहीण वनिता गायधनी, शवविच्छेदन करणारे डॉ़ आनंद पवार यांची साक्ष ग्राह्य धरीत आरोपी शशिकांत टावरे यास खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप, पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने सक्तमजुरी, आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी एक वर्षे सक्तमजुरी व पाचशे रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास, अशी शिक्षा सुनावली़