शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात विसर्जनासाठी गेलेल्या चौघा युवकांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 15:59 IST

नाशिक : शहर व तालुक्यात विविध ठिकाणी श्री गणेश विसर्जनासाठी गेलेल्या चौघा युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी घडली़ विसर्जनप्रसंगी बुडून मृत्यू झालेल्यांमध्ये जुने नाशिक, चेहेडी, श्रमिकनगर व मुंगसरा येथील युवकांचा समावेश आहे़ या घटनेमुळे गणेश विसर्जनाला गालबोट लागले असून, या प्रकरणी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़गणेश ...

ठळक मुद्देशहर व तालुक्यात विविध ठिकाणीजुने नाशिक, चेहेडी, श्रमिकनगर व मुंगसरा येथील युवकांचा समावेश गणेश विसर्जनाला गालबोट पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

नाशिक : शहर व तालुक्यात विविध ठिकाणी श्री गणेश विसर्जनासाठी गेलेल्या चौघा युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी घडली़ विसर्जनप्रसंगी बुडून मृत्यू झालेल्यांमध्ये जुने नाशिक, चेहेडी, श्रमिकनगर व मुंगसरा येथील युवकांचा समावेश आहे़ या घटनेमुळे गणेश विसर्जनाला गालबोट लागले असून, या प्रकरणी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़गणेश विसर्जनासाठी गंगापूर धरणावर गेलेला योगेश राम चौधरी (१९, रा़ वृंदावन गार्डन, गणेश चौक, श्रमिकनगर, सातपूर, नाशिक) या युवकाचा गंगापूर धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली़ आपल्या मित्रांसह योगेश हा आपल्या मित्रांसमवेत गणेश विसर्जनासाठी गेल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली़ याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़दुसरी घटना चेहेडी पंपिंग बंधारा येथे घडली़ किशोर कैलास सोनार (२४, रा़ शबनकर मळा, चेहेडी शिव, सिन्नर फाटा, नाशिकरोड) हा युवक दुपारच्या सुमारास गणेश विसर्जनासाठी चेहेडी पंपिंग बंधारा येथे गेला होता़ या ठिकाणी सेल्फी काढत असताना त्याचा तोल जाऊन तो बंधाºयात पडला़ त्यास नागरिकांनी तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाºयांनी तपासून मयत घोषित केले़ या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़तिसरी घटना पंचवटीतील टाळकुटेश्वर मंदिराजवळील गोदावरी नदीपात्रात घडली़ जुने नाशिकमधील नानावलीतील संभाजी चौकातील रहिवासी नारायण राजेंद्र सूर्यवंशी (१७) हा मुलगा सायंकाळी गणेश विसर्जनासाठी गेला होता़ सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास गणेश विसर्जन करीत असताना तो पाण्यात बुडाला़ त्यास नागरिकांनी तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाºयांनी तपासून मयत घोषित केले़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़गणेश विसर्जनासाठी गेलेला अठरा वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची चौथी घटना मुंगसरा गावाजवळ सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली़ गणेश राजाराम मराठे (१८, रा़ मुंगसरा, ता़ जि़ नाशिक) हा युवक घरगुती गणेश विसर्जनासाठी गावाजवळील डोहाजवळ गेला होता़ यावेळी त्याचा तोल जाऊन तो पाण्यात पडला व बुडून मृत्यू झाला़ या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़