शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जन्मदात्यानेच दिले साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यास चटके़...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 22:49 IST

नाशिक : पुणे येथील खासगी शिकवणी घेणाºया शिक्षिकेने बालवाडीच्या मुलाला अमानुषपणे मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच जन्मदात्यानेच आपल्या साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याच्या सर्वांगावर मच्छरअगरबत्तीने चटके दिल्याची अमानुष घटना इगतपुरी तालुक्यात घडली आहे़ संस्कार हेमंत राऊत (वय साडेतीन वर्षे, रा़ गोंदे, ता़ इगतपुरी, जि़ नाशिक) असे या दुर्दैवी चिमुकल्याचे नाव असून, त्यास ...

ठळक मुद्देपुण्यापाठोपाठ नाशिकातही चिमुकल्यावर अत्याचारइगतपुरी तालुक्यातील प्रकार :जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल

नाशिक : पुणे येथील खासगी शिकवणी घेणाºया शिक्षिकेने बालवाडीच्या मुलाला अमानुषपणे मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच जन्मदात्यानेच आपल्या साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याच्या सर्वांगावर मच्छरअगरबत्तीने चटके दिल्याची अमानुष घटना इगतपुरी तालुक्यात घडली आहे़ संस्कार हेमंत राऊत (वय साडेतीन वर्षे, रा़ गोंदे, ता़ इगतपुरी, जि़ नाशिक) असे या दुर्दैवी चिमुकल्याचे नाव असून, त्यास उपचारासाठी त्याच्या आईने जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे़

वाडीवºहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इगतपुरी तालुक्यातील गोंदे येथे हेमंत राऊत हा पत्नी भाग्यश्री व साडेतीन वर्षांचा मुलगा संस्कारसह राहतो़ गुरुवारी (दि़१४) रात्री ११ वाजेच्या सुमारास मद्यधुंद हेमंत राऊत याने अभ्यासाचे कारण काढून चिमुकल्या संस्कारचे तोंड, हात, पाय व गुप्तांग अशा सर्वांगावर जळत्या मच्छर कॉईलने चटके देऊन अमानुष मारहाण केली़ यामध्ये गंभीर जखमी झालेल्या संस्कारला त्याची आई भाग्यश्री हिने शुक्रवारी (दि़१५) दुपारी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत़दरम्यान, या प्रकरणी वाडीवºहे पोलिसांनी चिमुकल्याची आई भाग्यश्री हिच्या फिर्यादीवरून तिचा पती हेमंत रावत विरोधात भारतीय दंड विधान कलम ३२४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे़संस्कारचा सावत्र पितावाडीवºहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संस्कार हा भाग्यश्री रावत हिचा मुलगा असला तरी हेमंत राऊत हा त्याचा सावत्र पिता आहे़ मद्यधुंद हेमंत रावत याने अभ्यास न केल्याचे कारण काढून मुलाच्या सर्वांगावर जळत्या मच्छरच्या कॉईलचे चटके दिले़