शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अंबडच्या नीरज थर्माकोलला भीषण आग : लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 23:25 IST

नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील नीरज थर्माकोल अ‍ॅण्ड इलेक्ट्रिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला रविवारी (दि़१) सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागली़ यावेळी कंपनीच्या दुसºया मजल्यावर काम करीत असलेल्या २० कामगारांपैकी काहींनी उड्या टाकून तर काहींना सामाजिक कार्यकर्ते व अग्निशमन दलाच्या कर्मचाºयांनी बाहेर काढल्याने ते बचावल़े दरम्यान, पाच बंबांच्या साहाय्याने दोन तासांच्या ...

ठळक मुद्दे सायंकाळच्या सुमारास भीषण आग२० कामगार बचावल़े

नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील नीरज थर्माकोल अ‍ॅण्ड इलेक्ट्रिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला रविवारी (दि़१) सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागली़ यावेळी कंपनीच्या दुसºया मजल्यावर काम करीत असलेल्या २० कामगारांपैकी काहींनी उड्या टाकून तर काहींना सामाजिक कार्यकर्ते व अग्निशमन दलाच्या कर्मचाºयांनी बाहेर काढल्याने ते बचावल़े दरम्यान, पाच बंबांच्या साहाय्याने दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग विझविण्यात यश आले असले तरी यामध्ये कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे़अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार औद्योगिक वसाहतीतील शासकीय धान्य गुदाम परिसरातील प्लॉट नंबर डी - ६३ मध्ये अशोक नरहर ब्राह्मणकर (रा़ समर्थनगर, नाशिक) यांची नीरज थर्माकोल अ‍ॅण्ड इलेक्ट्रिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे़ कंपनीत थर्माकोलचे उत्पादन केले जात असून, रविवारी २० कामगार काम करीत होते़ सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अचानक या कंपनीला भीषण आग लागली़ थर्माकोल हे ज्वालाग्राही असल्याने अल्पावधीतच आगीने रौद्ररुप धारण केले होते़ या घटनेची माहिती काही नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलास दिली़आग लागली तेव्हा कंपनीच्या दुसºया मजल्यावर वीस कामगार काम करीत होते़ यापैकी काही कामगारांनी गॅलरीतून उड्या टाकल्या, तर काहींना कंपनीच्या आजूबाजूकडील कंपनीतील कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते धनंजय दातीर, सचिन दातीर, बाळासाहेब दोंदे, जनार्दन दातीर व अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले़ सिडको, सातपूर, शिंगाडा तलाव, के.के.वाघ महाविद्यालयाजवळील अग्निशमन केंद्र व महिंद्रा येथील अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते़ दोन तासांनंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले असले तरी यामध्ये कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे़ दरम्यान, या आगीच्या घटनेची अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़