शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

राज्य आरोग्य विभागाच्या गलथानपणामुळे अर्भकांचा मृत्यू : प्रीती मेनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 23:12 IST

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील अर्भकांच्या जीविताच्या रक्षणासाठी आवश्यक सोयीसुविधा न पुरविता वेळकाढू धोरणाचा अवलंब करणारा राज्य शासनाचा आरोग्य विभाग अर्भक मृत्यूस जबाबदार असल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रीती मेनन - शर्मा यांनी केला़ जिल्हा शल्य चिकित्सकांकडून अर्भक मृत्यूची वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई ...

ठळक मुद्देआम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्यासखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील अर्भकांच्या जीविताच्या रक्षणासाठी आवश्यक सोयीसुविधा न पुरविता वेळकाढू धोरणाचा अवलंब करणारा राज्य शासनाचा आरोग्य विभाग अर्भक मृत्यूस जबाबदार असल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रीती मेनन - शर्मा यांनी केला़ जिल्हा शल्य चिकित्सकांकडून अर्भक मृत्यूची वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे मेनन यांनी केली आहे़प्रीती मेनन यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडून अर्भक मृत्यूची माहिती जाणून घेतली़ यानंतर राज्य शासनाकडून जिल्हा रुग्णालयास आवश्यक त्या सेवासुविधा पुरविल्या जात नसल्याचे त्यांच्या लक्षात आले़ डॉ़जगदाळे यांनी अर्भकांचा जीव वाचविण्यासाठी राज्य शासनाकडे सीपॅप (पॉझिटीव्ह एअर प्रेशर) मशीनची मागणी केल्याचे सांगताच या मशीन केव्हा येणार याबाबत त्यांनी विचारणा केली़ जिल्हा रुग्णालयातील कर्मचाºयांच्या कामांबाबत माहिती घेतल्यानंतर जिल्हा रुग्णालयातील नवजात अर्भकांच्या नूतन इमारतीसाठीच्या अडथळ्यांची त्यांनी माहिती घेतली़मेनन यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे अर्भकांसाठी सरफॅक्शन इंजेक्शन, लसींचा मुबलक साठा, व्हेंटिलेटर, इन्क्युबेटरची मोठ्या प्रमाणात उपलब्धता करण्याची मागणी केली़ यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, एसएनसीयू कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज गाजरे उपस्थित होते़ जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीसाठी तोडाव्या लागणाºया वृक्षांबाबत आंदोलन करून आपल्याच कार्यकर्त्यांना खोडा घातल्याचे मेनन यांना पत्रकारांनी विचारताच त्यांनी सोयीस्करपणे या प्रश्नाला बगल दिली़