शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक : भंगार बाजारात आगीच्या दोन घटना

By admin | Updated: January 10, 2017 14:20 IST

नाशिकमधील भंगार बाजारातील अतिक्रमण हटवण्याचे काम सुरू असून दोन ठिकाणी आग लागली.

नरेंद्र दंडगव्हाळ, आॅनलाईन लोकमत
नाशिक, दि. १० -  मागील तीन दिवसांपासून भंगार बाजाराचे अतिक्रमण हटविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र भंगारमालाचा व पत्र्यांचा खच पडलेला आहे. या खचमधून वस्तू काढताना  व्यापा-यांना गॅस कटरच्या साहाय्याने  कापले जात आहे. त्यामुळे ठिणग्या उडून प्लॅस्टिक व लाकडी फळ्यांनी पेट घेतल्याने आग लागली.  दीड तासांतच आगीवर पुर्णपणे नियंत्रण मिळविणे शक्य अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले आहे. या घटनेत कुठल्याप्रकारची जीवित व वित्तहानी झाली नसल्याचे सुत्रांनी सांगितले.
 
अंबड सातपूर लिंकरोडवर महापालिकेच्या वतीने कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये अतिक्रण हटविले जात आहे. सुमारे साडेचारशेहून अधिक भंगारमालाची गुदामे जमीनदोस्त करण्यात आल्याने संपूर्ण भंगारबाजार नष्ट झाला आहे. यामुळे सर्वत्र प्लॅस्टिक, पत्रे, लोखंडी गज, लाकडी फळ्यांचा खच पडला असून या खचमधून व्यावसायिकांनी तातडीने वस्तू घेऊन जाव्यात, अशा सुचना  महापालिकेने दिल्या आहेत. पत्त्यांच्या इमल्याप्रमाणे कोसळलेल्या भंगार मालाच्या गुदामांमध्ये दबलेल्या वस्तूंची शोधाशोध सुरू असून यासाठी गॅस कटरमार्फत तुटलेले गज व शेडचे पत्रे कापले जात आहे. व्यावसायिकांकडून यासाठी घरगुती गॅससिलिंडरचा वापर केला जात आहे. यामुळे ठिणग्या पडून आगी लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अद्याप तीन वेळा भंगार बाजार भागात आगीच्या घटना घडल्या आहेत. सकाळी विराटनगर व दुपारी बारावाजेनंतर अजमेरी चौकामध्ये  दोन ठिकाणी प्लॅस्टिकच्या वस्तू व लाकडी फळ्यांनी पेट घेतला होता.
 
 घटनेची माहिती मिळताच सिडको, सातपूर, पंचवटी, नाशिकरोडया उपकेंद्राचे प्रत्येकी दोन तर मुख्यालयासह विभागीय कार्यालयाचे प्रत्येकी एक आणि औद्योगिक वसाहतीमधील काही खासगी बंबांच्या साहाय्याने लागलेल्या आगीवर तत्काळ पाण्याचा मारा करुन आग नियंत्रणात आणली गेली आहे. आग अचानकपणे लागली की लावण्यात आली याबाबत सत्त्यता अग्निशामक दलाकडून तपासली जात आहे.