ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. २ - नाशिक जिल्ह्यामध्ये पाणीपुरवठा करणारी धरणे दुथडी भरुन वाहत असली तरी, यामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पूरग्रस्त भागाची पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली.पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पूरग्रस्त पाहणी केल्यानंतर पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्याचे निर्देष जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त यांना दिले आहे. तसेच, त्यांनी गोदावरीचा जलस्थर कमी व्हावा म्हणून जलपूजन केले. यावेळी गिरीश महाजन यांच्यासोबत भाजप शहर अध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, पोलीस आयक्त जगन्नाथन, महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा, जिल्हाधिकारी राधाकृष्णन , महापालिका अधिकारी खुणे यांनीही पूरग्रस्त भागाची पाहणी केली.
नाशिक - पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केली पूरग्रस्त भागांची पाहणी
By admin | Updated: August 2, 2016 23:09 IST