शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये ओसरली माणुसकी; भिंत ओस

By admin | Updated: March 14, 2017 04:54 IST

नागपूर येथे सुरू झालेल्या माणुसकीची भिंत या उपक्रमापासून प्रोत्साहित होऊन नाशिकमधील काही मंडळांनी शहरात माणुसकीची भिंंत उभी केली

संदीप भालेराव, नाशिकनागपूर येथे सुरू झालेल्या माणुसकीची भिंत या उपक्रमापासून प्रोत्साहित होऊन नाशिकमधील काही मंडळांनी शहरात माणुसकीची भिंंत उभी केली. मात्र अल्पावधीतच नाशिककरांनी या भिंतीकडे पाठ केली असून, दुसऱ्याला उपयोगात येतील अशा वस्तूंऐवजी या ठिकाणी अडगळीचे साहित्य आणि कपड्यांच्या चिंध्या टाकल्या जात आहेत. काही ठिकाणी तर भिंत केव्हाच गायब झाली आहे. जेथे भिंत टिकून आहे तेथे नाशिककरांची माणुसकी ओसरल्याने की काय सध्या माणुसकीची भिंत ओस पडली आहे. मागील वर्षी आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दानशूर नाशिककरांच्या भरवशावर काही सामाजिक संस्थांनी ‘माणुसकीची भिंत’ हा उपक्रम सुरू केला. आपल्या घरातील वापरात नसलेले, परंतु चांगल्या स्थितीतील कपडे, वस्तू या ठिकाणी आणून द्यायच्या आणि ज्या गरजूंना त्या वस्तू उपयुक्त असतील त्यांनी त्या घेऊन जायच्या’ असा या भिंतीमागचा उद्देश. शहरातील केटीएचएम महाविद्यालय उड्डाणपुलाखाली, गोल्फ क्लबची संरक्षक भिंत तसेच नाशिक रोडला काही ठिकाणी ठरावीक भिंत ‘माणुसकीची भिंत’ म्हणून रंगविण्यात आली. या ठिकाणी नको असलेले कपडे अडकविण्यास हॅँगर्स लावले. महिला, पुरुष आणि लहान मुले यांच्यासाठीच्या कपड्यांसाठी स्वतंत्र हॅँगर्स लावले आहेत. त्यावेळी या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र अवघ्या चार-पाच महिन्यांपासून या भिंती ओस पडल्याचे चित्र आहे. गोल्फ क्लबजवळची भिंत तर गायबच झाली आहे. या ठिकाणची पाटीही पुसली गेली आहे. केटीएचएम उड्डाणपुलाखाली भिंत अस्तित्वात आहे. मात्र या ठिकाणी अक्षरश: फाटलेले, मळलेले इतकेच काय तर हात पुसायलाही कुणी वापरणार नाही इतके कळकट्ट कपडे ठेवून देण्यात आले आहेत. म्हणजे असे कपडे की ज्याचा वापर कुणालाही होणार नाही. वस्तू तर अभावानेच येतात. त्यातही तुटलेले फ्लॉवर पॉट, रंग उडालेल्या फ्रेम, तुटलेली प्लास्टिकची फुले अशा वस्तू अधिक असतात. खरे तर या वस्तूंचा कुणालाही उपयोग होणार नाही अशाच आहेत. खरे तर इतरांना उपयुक्त ठरतील अशा वस्तू जमा होतील, अशी आयोजकांनी अपेक्षा होती. परंतु लोक घरातील अडगळ कमी करण्यासाठी टाकाऊ वस्तू या भिंतीजवळ टाकत आहेत. वास्तविक हा उपक्रम चळवळ म्हणून पुढे येणे अपेक्षित असताना नकारात्मक मानसिकतेमुळे हा उपक्रम अर्ध्यावर सोडून देण्याची नामुष्की ओढावली आहे. (प्रतिनिधी)