शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

आठ वर्षांपुर्वी झालेल्या पुण्याच्या हडपसरमधील युवतीच्या ‘मर्डर मिस्ट्री’चे गुढ नाशिक पोलिसांनी केले उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 20:44 IST

नाशिक : पुणे-संगमनेर रस्त्यावरील चंदनापुरी घाटात २००८ साली झालेल्या तरुणीच्या खुनाचा उलगडा नाशिकच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (दि.१३) केला. या गुन्ह्यातील दोन्ही मित्रांना पोलिसांनी अटक करून संगमनेर तालुका पोलिसांच्या हवाली केले आहे. गुन्ह्यातील एका संशयिताने मयत तरुणीसोबत पळून जाऊन विवाह केला होता, असे पोलिसांनी सांगितले.याबाबत गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार ...

ठळक मुद्दे हे चौघे एकाच सदनिकेत वास्तव्यास होते. गुन्ह्यात नेमका कोणाचा सहभाग आहे, की तिघांनी मिळून कट रचला? या दिशेने संगमनेर पोलिसांचा तपास सुरू एका संशयिताने मयत तरुणीसोबत पळून जाऊन विवाह केला होता

नाशिक : पुणे-संगमनेर रस्त्यावरील चंदनापुरी घाटात २००८ साली झालेल्या तरुणीच्या खुनाचा उलगडा नाशिकच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (दि.१३) केला. या गुन्ह्यातील दोन्ही मित्रांना पोलिसांनी अटक करून संगमनेर तालुका पोलिसांच्या हवाली केले आहे. गुन्ह्यातील एका संशयिताने मयत तरुणीसोबत पळून जाऊन विवाह केला होता, असे पोलिसांनी सांगितले.याबाबत गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार नाशिकचे प्रतीक राजेंद्र धरणे (मूळ रा. सिडको) व विनित पुंडलिक झाल्टे (३०, साईसमर्थ रो-हाउस, दत्तचौक, सिडको) हे दोघे मित्र पुण्यात एका सदनिकेत राहत होते. प्रतीकचे हडपसर येथील रहिवासी असलेल्या अर्चना सोनवणे नावाच्या युवतीशी प्रेमसंबंध होते. त्याने अर्चनाला पळवून नेत आळंदीला विवाह केला होता. विवाहनंतर तो अर्चनासोबत आणि मित्र विनित आणि त्याचा मामा चंद्रकांत माधवराव पिंपळसकर (३५, रा.हडपसर) असे हे चौघे एकाच सदनिकेत वास्तव्यास होते. दरम्यान, विनित आणि अर्चनाचे प्रेमसंबंध निर्माण झाले आणि ही बाब निदर्शनास आल्यानंतर प्रतीक आणि अर्चनामध्ये वादविवाद झाला. दरम्यान, हे तिघे अर्चनाला घेऊन नाशिककडे निघाले असता चंदनापुरी घाटात थांबले. यावेळी तिघांपैकी एकाने अथवा तिघांनी मिळून अर्चनाचा ओढणीने गळा आवळून हत्त्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. कारण प्रतीक आणि विनित दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केल्यानंतर दोघांनी एकमेकांवर अर्चनाचा खून केल्याचा आरोप केल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहायक पोली आयुुुक्त अशोक नखाते यांनी सांगितले. गुन्ह्यात नेमका कोणाचा सहभाग आहे, की तिघांनी मिळून कट रचला? या दिशेने संगमनेर पोलिसांचा तपास सुरू झाला आहे. शनिवारी (दि.१४) गुन्हे शाखेने सर्व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून दोघा संशयित आरोपींना संगमनेर पोलिसांच्या हवाली केले आहे. या कारवाईमध्ये पोलीस निरिक्षक विसपुते, सचिन सावंत, पोलीस उपनिरिक्षक भिमराव गायकवाड, पोलीस नाईक संजय गामणे, रेखा गायकवाड अदिंचा समावेश आहे.