शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये मनसेला गळती सुरूच

By admin | Updated: October 19, 2016 05:45 IST

नगरसेवक शशिकांत जाधव यांनी कमळ हाती धरले, तर माजी गटनेता, नगरसेवक अशोक सातभाई हे आणखी एका नगरसेवकासह शिवबंधनात अडकले

नाशिक : महापालिकेत सत्तेवर असलेल्या मनसेला लागलेली गळती कायम असून, जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक शशिकांत जाधव यांनी कमळ हाती धरले, तर माजी गटनेता, नगरसेवक अशोक सातभाई हे आणखी एका नगरसेवकासह शिवबंधनात अडकले आहेत. त्यांच्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसलाही फटका बसला असून, स्थायी समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी सपत्नीक शिवसेनेत तर रूपाली गावंड यांनी भाजपात प्रवेश केला आहे. नाशिक महापालिकेच्या निवडणुकाजवळ येऊ लागल्याने पक्षांतराला वेग आला आहे. त्याअंतर्गत मंगळवारी मुंबई येथे मनसेचे अध्यक्ष शशिकांत जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत कमळ हाती घेतले. त्यांच्याबरोबरच काँग्रेसच्या नगरसेवक लता पाटील यांनीही भाजपात प्रवेश केला. पाटील यांचे पती नगरसेवक दिनकर पाटील यांनी अगोदरच भाजपात प्रवेश केला असल्याने त्यांचा प्रवेश अपेक्षित मानला जात होता, तर महापौरपदाच्या निवडणुकीत दोनदा डावलले गेल्याने नाराज असलेले शशिकांत जाधव यांचादेखील पक्ष बदल अपेक्षित मानला जात होता. शिवसेनेच्या दिवंगत नगरसेविक साधना जाधव यांचे पती मधुकर जाधव यांनीही भाजपात प्रवेश केला. भाजपाचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, देवयानी फरांदे, प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, उपाध्यक्ष वसंत गिते, सुनील बागुल तसेच विजय साने यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.शशिकांत जाधव यांच्याप्रमाणेच मनसेत गटबाजीमुळे नाराज असलेले माजी गटनेता - नगरसेवक अशोक सातभाई यांनी आणि फुलेनगर परिसराचे नगरसेवक डॉ. विशाल घोलप यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रवेश सोहळ्याप्रसंगी संपर्कप्रमुख अजय चौधरी, माजीमंत्री बबन घोलप, आ. योगेशघोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, शहरप्रमुख अजय बोरस्ते, माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड,माजी महापौर यतिन वाघ उपस्थित होते. (प्रतिनिधी)