शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

नाशकात उत्तर महाराष्ट्रातील पहिले स्वयंसाहाय्य विद्यापीठ

By admin | Updated: July 12, 2016 03:35 IST

संदीप तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन, औषध निर्माणशास्त्र अशा तंत्रशिक्षण महाविद्यालयाच्या माध्यमातून येथील शिक्षण क्षेत्रात प्रवेश

नाशिक : संदीप तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन, औषध निर्माणशास्त्र अशा तंत्रशिक्षण महाविद्यालयाच्या माध्यमातून येथील शिक्षण क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या संदीप फाउंडेशनने येथील शैक्षणिक प्रगतीत मोलाचा टप्पा गाठत स्वयंसाहाय्यता विद्यापीठाची स्थापना केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार संदीप विद्यापीठाला मान्यता मिळाली असून, विद्यापीठाच्या प्रथम कुलगुरूपदी डॉ. व्ही. बी. गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती संदीप फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप झा यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.संदीप फाउंडेशनतर्फे स्थापना झाल्यानंतर गेल्या आठ वर्षांत दोन अभियांत्रिकी, दोन तंत्रनिकेतन, एक औषधनिर्माण शास्त्र व व्यवस्थापन महाविद्यालयातून पुणे विद्यापीठांतर्गत ज्ञानदानाचे कार्य सुरू आहे. ही सर्व महाविद्यालये पुणे विद्यापीठांतर्गत सुरू राहणार असल्याचेही झा यांनी सांगितले. मुंबईतून १९९२ साली संदीप अकॅडमीच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील वाटचाल उत्तर महाराष्ट्रातील विद्यापीठापर्यंत येऊन पोहोचली असून, विद्यापीठाच्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्रास आवश्यक असलेले कु शल मनुष्यबळ उपलब्ध करून देणे हे या विद्यापीठाचे उद्दिष्ट असणार असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी फाउंडेशनचे मार्गदर्शक प्रा. पी. आय. पाटील, विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. आर. जी. तोताड, प्राचार्य एस. टी. गंधे आणि प्रशांत पाटील व आर्यन झा आदी उपस्थित होते. विद्यापीठात पहिल्या शैक्षणिक वर्षासाठी कायदा, व्यवस्थापन, निसर्ग व जैवविज्ञान, मानवी विज्ञान व वाणिज्य आदी शाखांचे पदवी अभ्यासक्रम सुरू होणार आहे, तर आगामी काळात डिझाईन, अच्युरिअल, नॅनो टेक्नोलॉजी, बायो टेक्नोलॉजी, इथिकल हॅकिंग, क्लाउड कम्प्युटिंग आदी अभ्यासक्रमांसह स्थानिक उद्योगासाठी आवश्यक असलेले वाहन टेक्नोलॉजी व शुगर टेक्नॉलॉजीसारखे अभ्यासक्रम सुरू करण्याचा विद्यापीठाचा मानस असल्याची माहिती झा यांनी दिली. (वाणिज्य प्रतिनिधी)