शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

‘नाशिक महामॅरेथॉन’चा बिगुल : हजारो आबालवृद्धांनी ‘प्रोमो-रन’मध्ये घेतला सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 09:12 IST

‘नाशिक महामॅरेथॉन’चा बिगुल रविवारी उगवत्या दिनकराच्या साक्षीने वाजला. ८ आॅक्टोबर रोजी होणाºया या स्पर्धेची रंगीत तालीम अर्थात ‘प्रोमो-रन’मध्ये हजारो नाशिककर अबालवृध्दांनी उत्सफूर्त धाव स्वत:साठी घेतली.

नाशिक : ‘नाशिक महामॅरेथॉन’चा बिगुल रविवारी उगवत्या दिनकराच्या साक्षीने वाजला. ८ आॅक्टोबर रोजी होणाºया या स्पर्धेची रंगीत तालीम अर्थात ‘प्रोमो-रन’मध्ये हजारो नाशिककर अबालवृध्दांनी उत्सफूर्त धाव स्वत:साठी घेतली.सकाळी सहा वाजता अनंत कान्हेरे मैदान (गोल्फ क्लब) येथून प्रथम दहा कि.मी.च्या प्रामो रनला प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. यावेळी आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, मोनिका आथरे, पोलिस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ चे कुलगुरू डॉ. इ वायूनंदन, लोकमतचे मार्केटिंग डायरेक्टर करण दर्डा, सौ. रुचिरा दर्डा, सहायक उपाध्यक्ष बी.बी. चांडक, निवासी संपादक किरण अग्रवाल, रवींद्र सपकाळ आदी मान्यवर उपस्थित होते. यानंतर पाच कि.मीच्या प्रोमो-रन’साठी धावपटूंनी धाव घेतली. तत्पुर्वी नाशिककरांनी ‘झुम्बा’ नृत्यामध्ये सहभागी होऊन स्पर्धेसाठी ‘वॉर्मअप’ के ले. पहाटे पाच वाजेपासूनच अनंत कान्हेरे मैदानाचा परिसर गजबजला होता. संगीताच्या तालावर थिरकत नाशिककरांनी स्वत:ला प्रोमो-रनसाठी पर्यायाने महामॅरेथॉन करिता सज्ज केले. पहिल्या टप्प्यात एक किलोमीटर अंतरावर ‘नाशिक ढोल’च्या वादकांनी पारंपरिक पध्दतीने ढोल-ताशा वादन करीत धावपटूंचा उत्साह वाढविला. तसेच धावपटूंच्या मार्गावर ठिकठिकाणी चिअरअप करण्यासाठी डान्सर कलावंतही आपला कलाविष्कार दाखवत प्रोत्साहित करत होते. या प्रोमो-रनमध्ये विविध मान्यवरांसह सेलिब्रिटींनी सहभाग घेतला आहे.

असा आहे ५ कि.मीचा मार्गगोल्फ क्लब मैदान, धामणकर चौक, मायको सर्कल, जलसिंचन भवन, शासकिय वसाहत, उंटवाडी सिग्नल, ठक्कर डोम, एबीबी सर्कल ला वळसा घालून त्र्यंबकरोडने सिब्बल हॉटेल, यामाहा शोरुम, वनविभाग कार्यालयमार्गे मायको सर्कलवरून धामणकर चौकातून सर्व धावपटू फिनिश लाईन गोल्फ क्लब (देशदूत सर्कल) येथे पोहचणार आहे.असा आहे १० कि.मी.चा मार्गगोल्फ क्लब येथून त्र्यंबक रस्त्याने प्रोमो रन ला सुरूवात. धामणकर चौक, मायको सर्क ल, एबीबी सर्कल, आयटीआय सिग्नल, महिंद्र सर्कलला वळसा घालून दुसºया बाजूने त्र्यंबक रोडने गोल्फ क्लबच्या फिनिश लाईनवर पोहचतील.

सुसज्ज व्यवस्थेमुळे समाधानमहामॅरेथॉनच्या धर्तीवर प्रोमो-रनकरिता ‘लोकमत’च्या वतीने सुसज्ज व्यवस्था व उत्तम नियोजन करण्यात आल्याने धावपटूंमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले. पाच व दहा कि.मीच्या मार्गाला जोडणारे सर्व उपनगरीय रस्ते बॅरेकेडिंग करुन बंद करण्यात आले होते. तसेच रस्त्यावर दिशादर्शक, मार्गदर्शक फलक लावण्यात आले होते. प्रत्येक किलोमीटरवर ‘लोकमत’चे स्वयंसेवक नियुक्त करण्यात आले होते. सर्व नियुक्त स्वयंसेवक धावपटूंना एनर्जी ड्रिंकसह पाण्याची बॉटल हातात ‘रेडी’ करुन देत होते.

वैद्यकिय खबरदारीधावपटूंचे आरोग्यासह वैद्यकिय खबरदारी घेण्यात आली होती. दोन्ही मार्गांवर कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्स फिरतीवर होती. या रुग्णवाहिकेच्या बिनतारी संदेश यंत्रणेच्या फ्रिक्वेन्सी क्रमांक १सोबत स्वयंसेवकांच्या वॉकी-टॉकी कनेक्ट होत्या. याबरोबरच फिजिओथेरपिस्टची टीमही उपलब्ध करून देण्यात आली होती.