शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात सर्वाधिक थंडी नाशिकला; पारा ५.८ अंशावर

By admin | Updated: January 11, 2017 17:19 IST

राज्यात नाशिक सर्वाधिक थंडीचे शहर म्हणून अग्रस्थानावर आहे. अहमदनगर, महाबळेश्वर, सातारा अशा सर्वच शहरांपेक्षा नाशिकमध्ये थंडीचा कडाका मागील चार दिवसांपासून

ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 11 -  राज्यात नाशिक सर्वाधिक थंडीचे शहर म्हणून अग्रस्थानावर आहे.  अहमदनगर, महाबळेश्वर, सातारा अशा सर्वच शहरांपेक्षा नाशिकमध्ये थंडीचा कडाका मागील चार दिवसांपासून सर्वाधिक आहे. किमान तापमानात सातत्याने होणा-या घसरणीमुळे नाशिककर गारठले आहेत. बुधवारी सकाळी हवामान खात्याने मोजलेले किमान तापमानाचा पारा ५.८ अंशावर स्थिरावला. मंगळवारी ६.५ अंशावर किमान तापमान होते. जिल्ह्यातील निफाड तालुक्यात थंडीची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली असून पारा ५ अंशावर आला आहे.
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशिककर चांगलेच गारठले असून  आतापर्यंत या हंगामातील सर्वात निचांकी तपमानाची नोंद बुधवारी हवामान खात्याकडून करण्यात आली. अहमदनगरचे किमान तपमान  ७.१, मालेगाव ७.४,  पुणे ७.७, सातारा १०.०, सांगली ११.५, सोलापूर १०.७, उस्मानाबाद ८.४, अकोला ९.५, अमरावती ९.२, महाबळेश्वर १२.० असे प्रमुख शहरांचा पारा पुण्याच्या वेधशाळेने नोंदविला.
जानेवारी महिना नाशिकचा इतिहास बघता दरवर्षी कडाक्याच्या थंडीचा राहिला आहे. २०१५ साली २५  डिसेंबरला हंगामातील  ५.४ अंश इतक्या निचांकी तापमानाची नोंद करण्यात आली होती. तसेच २०१६मध्ये २२ जानेवारीला ५.५ निचांकी तापमान नोंदविले गेले होते. वाढत्या थंडीच्या कडाक्यामुळे लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून डॉक्टरांकडून पाणी गरम करुन पिण्याचा सल्ला दिला जात आहे.