शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

नार्वेकर, जानभोर यांना पत्रकारिता पुरस्कार

By admin | Updated: April 6, 2016 22:06 IST

नागपूरच्या अरविंदबाबू देशमुख प्रतिष्ठानतर्फे अरविंदबाबू देशमुख पत्रकारिता पुरस्कारांचे मुंबईतील राजभवनात थाटात वितरण झाले. राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यपाल, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरणमुंबई: नागपूरच्या अरविंदबाबू देशमुख प्रतिष्ठानतर्फे अरविंदबाबू देशमुख पत्रकारिता पुरस्कारांचे मुंबईतील राजभवनात थाटात वितरण झाले. राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यभरातील ज्येष्ठ पत्रकारांना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. जीवनगौरव पुरस्कार मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांना तर नागपूर विभागीय पुरस्कार नागपूर ‘लोकमत’च्या गजानन जानभोर यांना प्रदान करण्यात आला. राजभवनात बुधवारी संध्याकाळी हा सोहळा थाटात पार पडला. पत्रकारितेच्या क्षेत्रात समाजजागृती आणि सामाजिक जीवनस्तर उंचावण्यासाठी कार्यरत असणाऱ्या पत्रकारांना गेल्या दशकभरापासून विदर्भाच्या स्तरावर हे पुरस्कार दिले जात होते. यंदा प्रथमच राज्यस्तरावर या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. विभागनिहाय पुरस्कार पटकावणे पत्रकार असे: मुंबई विभाग -शर्मिला कलगुटकर (मुंबई), पुणे-सातारा-सोलापूर विभाग- प्रशांत जोशी (सोलापूर), कोल्हापूर-सांगली-कोकण विभाग- जयसिंग कुंभार (सांगली), उत्तर महाराष्ट्र विभाग -दीप्ती राऊत (नाशिक), अमरावती विभाग -सोमनाथ सावळे (बुलढाणा), नागपूर विभाग -गजानन जानभोर (नागपूर), मराठवाडा विभाग -प्रमोद कुलकर्णी (बीड), विशेष पुरस्कार -इंग्रजी- संतोष आंधळे (मुंबई), हिंदी- संजय देशमुख (नागपूर). - पत्रकारांवरील हल्ले थांबावेत - राज्यपालराज्यासह अन्य ठिकाणीही पत्रकारांवर होणारे हल्ले क्लेषदायक असल्याचे राज्यपाल विद्यासागर यांनी सांगितले. त्यामुळे पत्रकारांना संरक्षण मिळण्यासाठी कठोर कायदा आणण्याची सूचना त्यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या कायद्यासाठी गंभीर असल्याचा उल्लेखही त्यांनी आवर्जून केला. पत्रकारांची सहकार्य लोकशाहीच्या मजबुतीकरणासाठी तसेच प्रशासकीय सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी अत्यावश्यक असल्याचेही राज्यपाल म्हणाले.