शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
4
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
5
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
6
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
7
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
8
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
9
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
10
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
11
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
12
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
13
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
14
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
15
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
16
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
17
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
18
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
19
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
20
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...

लाचखोरीच्या आरोपातून नरेंद्र मेहता दोषमुक्त

By admin | Updated: November 9, 2016 03:42 IST

लाचखोरीच्या आरोपातून मीरा भार्इंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांना ठाण्याच्या विशेष न्यायालयाने मंगळवारी दोषमुक्त केले.

ठाणे : लाचखोरीच्या आरोपातून मीरा भार्इंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांना ठाण्याच्या विशेष न्यायालयाने मंगळवारी दोषमुक्त केले. १४ वर्षे चाललेल्या या खटल्यातील सर्व साक्षीदार फितूर झाल्याने, बचाव पक्षाची बाजू बळकट झाली होती. मेहता यांचा हा एक प्रकारे राजकीय पुनर्जन्मच मानला जात आहे.ंमीरा भार्इंदर महानगरपालिकेच्या २00२ साली झालेल्या पहिल्या निवडणुकीत नरेंद्र मेहता अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले होते. डिसेंबर २00२ मध्ये कंत्राटदार हनुमंत मालुसरे यांनी हेमंत पटेल यांच्या गाळ्याची उंची वाढवण्याचे कंत्राट घेतले होते. याबाबतची माहिती मेहता यांना मिळाल्यानंतर, त्यांनी मालुसरे यांच्याकडे ५0 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी २0 हजार रुपयांचा पहिला हप्ता २७ डिसेंबर २00२ रोजी देण्याचे ठरले होते. दरम्यान, मालुसरे यांनी याबाबतची तक्रार ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) नोंदविली. मालुसरे आणि काशीनाथ दाणेकर हे २0 हजार रुपये घेऊन मेहता यांच्या कार्यालयात गेले त्यावेळी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने मेहता आणि त्यांच्या सहकाऱ्यांना रंगेहात पकडले. संपूर्ण प्रकरणाचा तपास करून, एसीबीने दोषारोपपत्र सादर केले. मेहता यांनी तक्रारदाराकडे लाच मागितल्याने सिद्ध होऊ न शकल्याने, विशेष न्यायाधिश व्ही. व्ही. बांबर्डे यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली. मेहता यांच्याविरूद्धचे हे प्रकरण ते नगरसेवक असतानाच्या काळातील आहे. दरम्यानच्या काळात ते मीरा भार्इंदर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडून आले. न्यायालयाच्या निकालावर त्यांच्या आमदारकीचे भवितव्य अवलंबून असल्याने राजकीय वर्तुळाचे या प्रकरणाकडे लक्ष लागून होते. ‘ती’ रक्कम दुचाकीची, बचाव पक्षाचा युक्तिवादघटनेच्या १0 दिवसांपूर्वी तक्रारदार मालुसरे यांनी त्यांच्या मुलासाठी नरेंद्र मेहता यांच्या प्रणव मोटार्समध्ये मोटारसायकल खरेदीसाठी आगाऊ रक्कम जमा केली होती. घटनेच्या दिवशी मालुसरे यांनी दिलेले २0 हजार म्हणजे त्या व्यवहारातील उर्वरित रक्कम होती, असा युक्तिवाद नरेंद्र मेहता यांच्या वतीने अ‍ॅड. हर्षद एच. पोंडा, अ‍ॅड. सी.व्ही. बाबरदेसाई, अ‍ॅड. राजन साळुंके आणि अ‍ॅड. एस.डी. गायकवाड यांनी केला. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरून, मेहता यांची निर्दोष मुक्तता केली.मेहता यांनी तक्रारदाराकडे लाच मागितल्याचे सरकार पक्षास न्यायालयात सिद्ध करता आले नाही. तक्रारदार वगळला तर, अन्य कुणीही मेहतांविरूद्धच्या आरोपांवर न्यायालयासमोर बोलू शकले नाही. या प्रकरणातील पंच, सर्व साक्षीदार फितूर झाले. एवढेच काय, मेहता यांना पैसे देण्यासाठी तक्रारदारासोबत गेलेले त्यांचे मित्र दाणेकर यांची साक्षही न्यायालयासमोर टिकू शकली नाही. न्यायालयाच्या निर्णयास आव्हान, फितूर पंचावरही कारवाई : सरकार पक्षाची बाजू जिल्हा सरकारी वकील संगीता फड यांनी मांडली. न्यायालयाच्या निर्णयास उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. न्यायालयात फितूर झालेले या प्रकरणातील पंच रमेश गराडे हे शासकीय कर्मचारी आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याचा अर्ज अ‍ॅड. फड यांनी न्यायालयासमोर सादर केला व न्यायालयाने तो मंजूर केला.