सरकारची घोषणा : कोल्हापूर १ जूनपासून टोलमुक्तमुंबई - मुंबई शहराच्या प्रवेशद्वारावरील पाच टोलनाक्यांवर हलक्या चारचाकी वाहनांना (कार, जीप आणि एसटी व सिटी बसेस) टोलमुक्ती देण्याचा निर्णय येत्या आॅगस्टमध्ये घेण्यात येईल, तर कोल्हापूरकरांना ३१ मेच्या मध्यरात्रीपासून टोलमुक्ती दिली जाईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज जाहीर केले. मुंबईतील एन्ट्री व एक्झिट पॉइंटवर टोल बंद करण्याबाबत वित्तीय व कायदेशीर बाबी तपासण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव (बांधकाम) आनंद कुळकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असून, ही समिती ३० जुलैपर्यंत शासनाला अहवाल सादर करेल. त्यानंतर आॅगस्टपासून हलक्या वाहनांना टोलमुक्ती देण्याचा निर्णय घेतला जाईल. या नाक्यांवरून जाणारी ८५ टक्के वाहने ही हलकी चारचाकी असून, त्यांना टोलमुक्ती द्यायची म्हणजे कंत्राटदार कंपनीला २,५०० ते ३,००० कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. त्याची तजवीज कशी करायची याचे सूत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवीत आहेत, असे पाटील यांनी सांगितले.अवजड वाहनांना टोलमुक्ती नाहीमोठ्या (अवजड) वाहनांना राज्यातील कोणत्याही नाक्यावर (संपूर्ण टोलमुक्ती मिळालेले नाके वगळता) टोलमुक्ती मिळणार नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोल कायम राहणार असून, हा मार्ग सहापदरी करण्यात येणार आहे. (विशेष प्रतिनिधी)कोल्हापूरचा फॉर्म्युलाच्कोल्हापूरमधील टोल बंद करायचा तर आम्हाला ६०० कोटी रुपये द्या, अशी मागणी कंत्राटदार आयआरबी कंपनीने केली आहे. सरकार आणि महापालिकेच्या म्हणण्यानुसार हा आकडा ३२५ कोटी रुपयांपर्यंत जातो. च्राष्ट्रीय महामार्गांवर हलक्या वाहनांना टोलमुक्ती देण्याचा फॉर्म्युला केंद्र सरकार करीत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित असलेल्या महाष्ट्रातील ४० नाक्यांवर हलक्या वाहनांवरील टोल बंद होणार आहे. च्यासंदर्भात नेमलेली समिती या बाबतचा फॉर्म्युला निश्चित करेल आणि कोल्हापूरकरांना ३१ मेच्या मध्यरात्रीपासून टोलमुक्तीची बातमी दिली जाईल, असे पाटील म्हणाले.
आॅगस्टपासून मुंबई शहरात विनाटोल प्रवेश
By admin | Updated: April 12, 2015 02:38 IST