ऑनलाइन टीम
नांदेड, दि. १३ - विजांच्या गडगडाटांसह आलेल्या पहिल्याच पावसानं नांदेडमध्ये कहर केला असून वीज कोसळून सात जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात विविध ठिकाणी पावसाचे आगमन झाले असून काही ठिकाणी विजांचा तडाखाही जाणवला आहे. नांदेडातील माहूर येथे वीज कोसळून तीन जणांचा, कंधारमध्ये दोन जणांचा, तर लोहा व मुखेड येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.