शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
अंत्यसंस्काराच्या दिवशी कापला केक; चितेवर ठेवण्यापूर्वी वडिलांनी साजरा केला मुलीचा वाढदिवस
3
स्वतःवर गोळी झाडणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याची IAS पत्नी आली समोर; एफआयआर दाखल, कुणावर केले आरोप?
4
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
5
"भाई, ती मुलगी नाही...एक पंजा अन्...!"; थेट वाघोसोबतच 'लिप लॉक' करताना दिसला तरुण, Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल
6
घरबसल्या महिन्याला ₹९२५० ची कमाई करुन देणारी पोस्टाची स्कीम! पण एक चूक पडेल भारी, बसू शकतो ३० हजारांचा फटका
7
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
8
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
9
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
10
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
11
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
12
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
13
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
14
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
15
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
16
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
17
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
18
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
19
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
20
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन

नांदायला नकार दिला, म्हणून केला हल्ला!

By admin | Updated: October 20, 2016 02:10 IST

संगीता सुर्वे या महिला पोलिसावर चारकोपमध्ये पतीने चाकू हल्ला करण्याची घटना मंगळवारी पहाटे घडली होती.

मुंबई : संगीता सुर्वे या महिला पोलिसावर चारकोपमध्ये पतीने चाकू हल्ला करण्याची घटना मंगळवारी पहाटे घडली होती. याप्रकरणी संगीताने सोबत नांदायला नकार दिला,म्हणून तिच्यावर हल्ला केल्याचे पोलीस चौकशीत उघड झाले आहे. संगीता सुर्वे (२६) यांच्यावर त्यांचा पती प्रीतम अहिरेकर याने जवळपास तेरा वार केले आहेत. ज्यामुळे अद्याप त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे चारकोप पोलिसांकडून सांगण्यात आले. प्रीतम आणि संगीता यांच्या लग्नाच्या काही महिन्यानंतर त्यांचे एकमेकांशी वाद होऊ लागले. तो संगीता यांच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. याला कंटाळून संगीता वेगळ्या राहू लागल्या. त्यातच अहिरेकर कामावर अनुपस्थिती लागल्याने त्याला नोकरी देखील गमवावी लागली. ज्यात त्याला दारूचे व्यसन लागले. सुरक्षारक्षकाचे काम करून तो स्वत:चा उदरनिर्वाह करू लागला. मात्र नंतर त्याने संगीता यांना शोधण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी तो त्यांच्या गावी देखील गेला. मात्र नातेवाईकांनीही त्याला टोमणे मारण्यास सुरवात केली. तसेच कोणीही त्याला संगीताचा पत्ता देत नव्हते. त्यामुळे त्याने गावच्या पत्त्यावर कायदेशीर नोटीस पाठवली . संगीताचा चारकोपमधील पत्ता मिळाल्याने त्याने तिच्याकडे धाव घेतली. सोमवारी रात्री तो संगीता राहत असलेल्या सह्याद्रीनगरच्या सदगुरु अपार्टमेंटमध्ये आला. रात्री त्याने एक चाकू विकत घेत पहाटे संगीताच्या घरी जाऊन त्यांच्यावर हल्ला केला. (प्रतिनिधी) >‘पुन्हा नव्याने संसार सुरु करू, अशी विनंती मी संगीताला करायला गेलो होतो मात्र तिने सोबत नांदायला नकार दिला आणि त्या रागाच्या भरात मी तिच्यावर हल्ला केला, असे त्याने चारकोप पोलिसांना दिलेल्या जबाबात अहिरेकरने म्हंटले आहे. त्याला चारकोप पोलिसांनी मंगळवारी स्थानीक न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला २१ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.