शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

नांदा सौख्यभरे फेम 'ललिता' आणि फुलराणीला लागले म्हाडाचे घर

By admin | Updated: August 10, 2016 11:55 IST

हेमांगी कवी आणि सुहास परांजपे या दोघांनाही म्हाडाची लॉटरी लागली असून त्यांना बोरिवलीत घर मिळणार आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १०  - मुंबईत आपले स्वत:चे घर असावे अशी अनेकांची इच्छा असते. तशी ती कलाकारांचीही असते. त्यामुळे म्हाडाच्या घरासाठी लॉटरी निघते त्यावेळी सर्वसामान्यांबरोबर कलाकाराही अर्ज करतात. यावेळच्या म्हाडाच्या लॉटरीमध्ये हेमांगी कवी आणि सुहास परांजपे या दोन अभिनेत्रींचे भाग्य खुलले आहे. 
 
हेमांगीने म्हाडाच्या घरासाठी यापूर्वी तब्बल सातवेळा अर्ज केला होता. अखेर आठव्या प्रयत्नात तिला यश मिळाले. छोटया पडद्यावर विविध भूमिका साकारल्यानंतर हेमांगी सध्या 'ती फुलराणी' या नाटकातून आपली छाप उमटवत आहे. सुहास परांजपे झी मराठी वाहिनीवरील 'नांदा सौख्यभरे' या मालिकेतील सासूच्या भूमिकेमुळे चर्चेत आहेत. त्यांनी रंगवलेली सासू प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. 
 
मागच्यावर्षी म्हाडाच्या लॉटरीमध्ये टाईमपास फेम दगडू उर्फ प्रथमेश परब आणि अभिनेत्री विशाखा सुभेदार यांना म्हाडाचे घर मिळाले होते. यावेळी  म्हाडाच्या घरासाठी ‘राधा ही बावरी’फेम अभिनेत्री श्रुती मराठे, ‘बँडीट क्वीन’ आणि ‘वॉटर’फेम अभिनेत्री सीमा बिस्वास, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’फेम तनुज महाशब्दे यांनी अर्ज केला आहे.