शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

नाना पाटेकर, कनक रेळे यांना ‘गोदावरी गौरव’

By admin | Updated: February 7, 2016 04:14 IST

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर, प्रसिद्ध नृत्यांगना कनक रेळे यांना जाहीर झाला आहे. नाशिकचे

नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर, प्रसिद्ध नृत्यांगना कनक रेळे यांना जाहीर झाला आहे. नाशिकचे महाजन बंधू, डॉ. शशिकुमार चित्रे, चेतना सिन्हा, बाळकृष्ण दोशी यांचाही पुरस्कारार्थींमध्ये समावेश आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनी, येत्या १० मार्च रोजी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिरात होईल.कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने उपाध्यक्ष संजय पाटील, कार्यवाह प्रा. मकरंद हिंगणे, विश्वस्त विनायक रानडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत या पुरस्कारांची घोषणा केली. दर वर्षाआड दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारांचे यंदाचे तेरावे वर्ष आहे. लोकसेवा, चित्रपट / नाट्य, नृत्य / संगीत, चित्र / शिल्प, ज्ञान-विज्ञान, क्रीडा / साहस अशा सहा क्षेत्रांत संस्मरणीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा या निमित्त गौरव केला जातो. कुसुमाग्रजांच्या संकल्पनेतून १९९२ मध्ये सुरू झालेले हे पुरस्कार म्हणजे त्या-त्या मान्यवरांना केलेला ‘कृतज्ञतेचा नमस्कार’ असल्याचे तात्यासाहेब म्हणत. लोकसेवा क्षेत्रात साताऱ्याच्या सामाजिक कार्यकर्त्या चेतना सिन्हा, चित्रपट क्षेत्रात नाना पाटेकर, नृत्य क्षेत्रात कनक रेळे, विज्ञान क्षेत्रात मुंबईचे भौतिकशास्त्रज्ञ डॉ. शशिकुमार चित्रे, क्रीडा क्षेत्रात अमेरिकेतील खडतर सायकल शर्यत जिंकणारे नाशिकचे डॉ. हितेंद्र व महेंद्र महाजन, तर शिल्प क्षेत्रात बाळकृष्ण दोशी यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. २१ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आतापर्यंत डॉ. प्रकाश आमटे, गंगूबाई हनगल, हृषिकेष मुखर्जी, रघुनाथ माशेलकर यांसारख्या दिग्गजांना गौरवण्यात आले आहे.