शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
5
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
6
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
7
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
8
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
9
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
10
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
11
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
12
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
13
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
14
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
15
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
16
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
17
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
18
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
19
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
20
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका

‘सेल्फी विथ ट्री’ स्पर्धेतील विजेत्यांची नावे जाहीर

By admin | Updated: July 28, 2016 01:02 IST

वनविभागाच्या वतीने १ ते ३ जुलैदरम्यान राज्यभरात घेण्यात आलेल्या ‘सेल्फी विथ ट्री’ स्पर्धेतील विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यासाठी वनभवन येथे आयोजित

नागपूर : वनविभागाच्या वतीने १ ते ३ जुलैदरम्यान राज्यभरात घेण्यात आलेल्या ‘सेल्फी विथ ट्री’ स्पर्धेतील विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यासाठी वनभवन येथे आयोजित खास ‘ड्रॉ’मध्ये स्वत: प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनदल प्रमुख) यांच्या उपस्थितीत २५ विजेत्यांची निवड करण्यात आली. तांत्रिक कारणांमुळे त्यापैकी २ नावे बाद करून, अन्य २३ जणांना विजेते ठरविण्यात आले आहे.या विजेत्यांना २९ जुलै रोजी नागपुरात आयोजित जागतिक व्याघ्रदिन समारंभात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. वनविभागाच्या वतीने १ ते ७ जुलैदरम्यान वनमहोत्सव साजरा करण्यात आला. यात १ जुलै रोजी राज्यभरात एकाच दिवशी दोन कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आखण्यात आला होता. त्यानुसार, या दिवशी राज्यभरात २ कोटी ८१ लाख ३८ हजार ६३४ झाडांची लागवड करण्यात आली. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून ‘सेल्फी विथ ट्री’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.हे आहेत विजेतेसुरेश पाऊल, देवनाश चौरसिया व नितीन रेवतकर (नागपूर) यांच्यासह मुकेश माकडे (मुंबई), ऋषिकेश बावणे (अमरावती), प्रकाश पाटील संदीप पटोले, संजय मिथारी व सुनील पवार (कोल्हापूर), रामजी गगरानी (हिंगोली), दीपाली पाटील (धुळे), मनीष मंत्री (वाशिम), पारस शहाणे (पालघर), डॉ. स्वाती राऊत (सोलापूर), आशिष निरुडे व नामदेव भोये (लातूर), विराट दुसाने (नाशिक ), राजीव गोधेराव, गजानन जकाते, राजेंद्र पाटील, विपेश देधिया (मुंबई), नारायण पालोडकर (पुणे) यांचा समावेश आहे.