शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

नागपूरच्या पर्णिकाचे युनिक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव

By admin | Updated: October 17, 2014 01:05 IST

भारताच्या पहिल्या रेकॉर्ड बुकच्या दुसऱ्या आवृत्तीसाठी नागपुरातील ९ वर्षाच्या पर्णिका ढेंगरे या बालिकेने विक्रम नोंदविला आहे. भटिंडा, पंजाब येथे झालेल्या स्पर्धेत पर्णिकाने चक्रासनात १०० मीटर

गिनीज बुकमध्ये नाव नोंदणीसाठी पर्णिका ढेंगरेचे प्रयत्न नागपूर : भारताच्या पहिल्या रेकॉर्ड बुकच्या दुसऱ्या आवृत्तीसाठी नागपुरातील ९ वर्षाच्या पर्णिका ढेंगरे या बालिकेने विक्रम नोंदविला आहे. भटिंडा, पंजाब येथे झालेल्या स्पर्धेत पर्णिकाने चक्रासनात १०० मीटर अंतर केवळ एक मिनिटात पार केले. पर्णिका चक्रासनात केवळ चालत नाही तर धावते. तिच्या या अनोख्या विक्रमासाठी युनिक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तिचे नाव नोंदविण्यात आले असून नागपूरकरांची मान उंचावण्याचे कार्य तिने केले आहे. पर्णिकाने चक्रासनात उलट दिशेने धावण्यात प्राविण्य प्राप्त केले आहे. असे प्राविण्य आतापर्यंत जगात कुणीही मिळविल्याची नोंद नाही. पर्णिका यानंतर गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदविण्याचा प्रयत्न करणार आहे. तिला चक्रासनात धावण्याचे प्राविण्य मिळविण्यासाठी तिचे गुरू गजानन लडी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनानेच हे यश मिळाले असल्याची भावना पर्णिकाने व्यक्त केली आहे. इतक्या कमी वयात तिने मिळविलेले यश प्रशंसनीय आहे. पर्णिका व्ही. टी. कॉन्व्हेन्ट, अत्रे लेआऊटची विद्यार्थिनी असून ती चौथ्या वर्गात शिकत आहे. तिचे गुरु गजानन लडी यांनीही चक्रासनात त्यांचाच विक्रम मोडला आहे. ते शाब्बास इंडिया या मालिकेचे विजेते आहे. पोटावर ६० किलो वजन ठेवून एक मिनिट उभे राहण्याचा त्यांचा विक्रम आहे. पर्णिकाचे नाव यापूर्वी २०१३ साली इंडिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंदविण्यात आले आहे. नियमित योगासने करण्याचा छंद पर्णिकाला आहे. विविध योगासन स्पर्धेत आतापर्यंत तिला अनेक पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)चक्रासनात स्वतंत्र ओळख निर्माण करायची आहे चक्रासनाच्या माध्यमातून संपूर्ण जगात मला स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करायची आहे. आतापर्यंत अनेक योगासन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला. गुरू गजानन लडी यांच्या मार्गदर्शनान हे यश मिळते आहे. जगात चक्रासनाच्या माध्यमातून माझे आणि देशाचे नाव उंच करण्यासाठी अधिक परिश्रम घेण्याची तयारी पर्णिकाने दर्शविली आहे.