शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

शिशुविहारच्या नावाखाली मनमानी कारभार सुरूच

By admin | Updated: May 14, 2017 05:25 IST

उत्तम दर्जाचे, चांगल्या शिक्षकांकडून शिक्षण मिळावे, म्हणून पालक चांगल्या शाळेची निवड करण्यासाठी सतर्क असतात.

पूजा दामले । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : उत्तम दर्जाचे, चांगल्या शिक्षकांकडून शिक्षण मिळावे, म्हणून पालक चांगल्या शाळेची निवड करण्यासाठी सतर्क असतात. पहिलीला प्रवेश घ्यायला गेल्यास, ‘इन हाउस अ‍ॅडमिशन’ फुल झाल्याने प्रवेश नाकारला जाईल, या भीतीने पूर्व प्राथमिकला प्रवेश घेण्यासाठी जिवाचा आटापिटा केला जातो. त्यासाठी पालक हजारो-लाखो रुपये मोजायला तयार असतात. प्रत्यक्षात मात्र, या शिशुविहार अथवा पूर्व प्राथमिक शाळांची नोंदणीच होत नसल्याने, राज्यासह मुंबईत पूर्व प्राथमिक शाळांच्या संस्थाचालकांचा अंदाधुंद मनमानी कारभार सध्या खुलेआमपणे सुरू आहे. मुंबईत साधारण २ हजार ८०० पूर्व प्राथमिक शाळा आहेत. यातील बहुतांश शाळांचा कारभार मनमानी पद्धतीने सुरू आहे. या शाळांची महापालिका अथवा राज्य सरकारकडे कोणत्याही प्रकारची नोंद नाही. त्यामुळे या शाळांचा आकडा उपलब्ध नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून शिक्षण संस्थाचालकच मनमानी कारभार करून, पूर्व प्राथमिक शाळा चालवत आहेत. यामुळे पालकांची पूर्व प्राथमिक शाळांमध्ये होणारी लूट, पालकांवर होणारा अन्याय यासंदर्भात ते कोणाकडेही दाद मागू शकत नाहीत. शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतरही कारवाई होण्याची शाश्वती नाही. कारण पूर्व प्राथमिक शाळांसाठी कायदा, नियमावलीच आजमितीला अस्तित्वात नाही. शासनाच्या शाळेच्या व्याख्येनुसार, इयत्ता पहिलीपासून शाळा सुरू होते. परंतु आता वाढत्या शैक्षणिक स्पर्धेमुळे पालक प्ले गु्रप, नर्सरीत मुलांना प्रवेश घेऊन देतात. त्यासाठी जानेवारी, डिसेंबरपासूनच शाळांबाहेर रांगा लावतात. पूर्व प्राथमिकची नोंदणीच केली जात नसल्याने, शिक्षण विभागाकडे या शाळांची कोणतीही अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. या शाळा किती जागेत असाव्यात, कोणत्या सुविधा शाळेत असाव्यात, किती शुल्क आकारावे, किती तास शाळा असावी, असे कोणतेच नियम या शाळांना नाहीत. त्यामुळे काही ठिकाणी चांगल्या शाळेत, तर दुसरीकडे एका खोलीतही पूर्व प्राथमिक शाळा सुरू आहेत. या शाळांविषयी अनेक तक्रारी शिक्षण विभागाकडे येत असतात, पण नोंदणी नसल्याने कारवाई करता येत नसल्याचे, एका शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला सांगितले. >४१८ प्राथमिक अनुदानित शाळा मुंबई महापालिका क्षेत्रात इयत्ता पहिली ते चौथी या खासगी प्राथमिक अनुदानित शाळांची संख्या ४१८ आहे, तर विनाअनुदानित शाळांची संख्या ६७२ आहे. सर्वसाधारणपणे या सर्व शाळांमध्ये पूर्व प्राथमिकचे वर्ग सुरू आहेत, पण याची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही.