शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दलितांच्या नावावर शिक्षणसम्राटांचा डल्ला

By admin | Updated: February 4, 2016 04:26 IST

राज्यातील व्यावसायिक कॉलेज आणि नर्सिंग कॉलेजांमध्ये गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये केवळ आदिवासी आणि दलित विद्यार्थीच शिकत होते, यावर तुमचा विश्वास बसणार नाही

यदु जोशी,  मुंबईराज्यातील व्यावसायिक कॉलेज आणि नर्सिंग कॉलेजांमध्ये गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये केवळ आदिवासी आणि दलित विद्यार्थीच शिकत होते, यावर तुमचा विश्वास बसणार नाही; पण वस्तुस्थिती तशीच आहे. शंभर टक्के दलित विद्यार्थी असल्याची आकडेवारी कागदोपत्री देऊन शेकडो संस्थांनी शासनाच्या तिजोरीवर अक्षरश: कोट्यवधी रुपयांचा डल्ला मारला.राज्याचे अपर पोलीस महासंचालक के.वेंकटेशम यांच्या अध्यक्षतेखालील टास्क फोर्स सध्या शिष्यवृत्ती घोटाळ्याची कसून चौकशी करीत असून संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेणे सुरू झाले आहे. या चौकशीदरम्यान या घोटाळ्यांसंदर्भात धक्कादायक माहिती समोर येत आहे. अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती दिली जात होती. म्हणून त्यांचे प्रवेश कागदोपत्री दाखविण्यात आले आणि त्यांच्या नावे संस्थाचालक श्रीमंत झाल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. मराठवाडा आणि धुळे जिल्ह्णात आताही असे प्रकार सुरू आहेत आणि विदर्भात असे प्रकार यापूर्वी सर्रास घडले. वर्धा, अमरावती, गडचिरोलीत तर प्रचंड बोगस प्रवेश दाखविण्यात आले होते. या महाघोटाळ्यात राज्यातील अनेक नामवंत संस्थाचालक तसेच शिक्षणसम्राट अडकण्याची शक्यता आहे. मंत्रालयापासून जिल्हा पातळीपर्यंतच्या अधिकाऱ्यांचे आणि शिक्षण संस्थाचालकांचे काय साटेलोटे होते, याबाबतही चौकशी केली जाणार आहे. टास्क फोर्सने ५ आणि ६ फेब्रुवारीला संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुंबईत चौकशीसाठी बोलविले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिल्हा व्यवसाय प्रमाणपत्र अभ्यासक्रम, एमएसबीटीचे अभ्यासक्रम, हिंदी राष्ट्रभाषा ज्ञान मंडळ यांच्या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांना केंद्र सरकारची शिष्यवृत्ती देय नव्हती. तरीही राज्य शासनाने त्यांच्या अभ्यासक्रमांसाठी कोट्यवधी रुपयांची शिष्यवृत्ती दिली. त्यासाठीचे परिपत्रक मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी वेळोवेळी काढले. त्यातून संस्थांना मलिदा मिळाला आणि सरकारच्या तिजोरीवर भार पडला.