शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

दारिद्रय़ रेषेखालील यादीत चक्क आमदाराचे नाव!

By admin | Updated: June 29, 2016 00:26 IST

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठीही ठरविले पात्र: आ.बोंद्रेंनी उडवली अंमलबजावणी यंत्रणेची खिल्ली.

सुधीर चेके पाटील/चिखली (जि. बुलडाणा)देशातील गोरगरिबांच्या हितासाठी अहोरात्न झटणारे पंतप्रधान व त्यांचे कर्तव्यदक्ष सरकार अशी स्वत:ची पाठ थोपटून घेणार्‍या केंद्र सरकारवर चिखलीमध्ये नामुष्कीचा प्रसंग ओढवला आहे. सरकारी अधिकार्‍यांच्या बेजबाबदार कारभारामुळे आ. राहुल बोंद्रे यांचे नाव चक्क दारिद्रय़ रेषेखालील गरिबांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. यासोबतच यादीचा संदर्भ घेऊन प्रधानमंत्नी उज्ज्वला योजनेतील मोफत गॅस जोडणीसाठीचे पात्न लाभार्थी म्हणूनदेखील आमदारांचे नाव गॅस एजन्सीला प्राप्त झाले असल्याने प्रशासनाच्या या बेपर्वाईवर आ. बोंद्रेंनी जोरदार ताशेरे ओढत हा भोंगळ कारभार म्हणजे ह्यमेक इन इंडियाह्ण असल्याचा टोला लगावला आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या इण्डेन गॅस कंपनीकडून स्थानिक वितरकाला प्रधानमंत्नी उज्ज्वला योजनेंतर्गत ज्या गोरगरिबांना मोफत गॅस जोडण्या द्यायच्या आहेत, त्यांची यादी नुकतीच प्राप्त झाली, तेव्हा हे बिंग फुटले. या यादीत चक्क आमदार राहुल बोंद्रे यांचे नाव पाहून वितरक अचंबित झाले. या प्रकाराची वाच्यता झाल्यानंतर यामागील भोंगळ व बेजबाबदार कारभार उघड झाला आहे. ख-या लाभार्थ्यांना डावलले!भारतातील महिलांना स्वयंपाक करताना मोठय़ा प्रमाणात धुराचा सामना करावा लागतो. ही परिस्थिती बदलण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. या योजनेंतर्गत गरीब कुटुंबातील महिला सदस्याच्या नावे एलपीजीचे कनेक्शन देण्यात येणार आहे. दारिद्रय़ रेषेखाली कुटुंबांना याचा लाभ दिल्या जाणार आहे. सरकारची ही योजना गोरगरिबांसाठी लाभदायी असली तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी न होता खर्‍या लाभार्थ्यांना डावलून धनाधांडग्यांनाच त्याचा लाभ दिल्या जात असल्याची बाब यानिमित्ताने उघड झाली आहे.