शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कृषी कर्जाच्या नावाखाली खासगी कंपन्यांवर खैरात!

By admin | Updated: January 1, 2016 04:36 IST

कृषी क्षेत्राला कर्जवाटप करण्याच्या नावाखाली गेल्या काही वर्षांत राष्ट्रीयीकृत, खासगी बँका व वित्तसंस्थांनी कोट्यवधी रुपयांची खैरात कॉर्पोरेट कंपन्या, नागरी पतसंस्थांना दिल्याची धक्कादायक

- यदु जोशी,  मुंबईकृषी क्षेत्राला कर्जवाटप करण्याच्या नावाखाली गेल्या काही वर्षांत राष्ट्रीयीकृत, खासगी बँका व वित्तसंस्थांनी कोट्यवधी रुपयांची खैरात कॉर्पोरेट कंपन्या, नागरी पतसंस्थांना दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी राज्य शासनाच्या वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. राष्ट्रीयीकृत, खासगी बँकांनी जास्तीतजास्त शेतीसाठी पतपुरवठा करावा, असा दबाव केंद्र आणि राज्य सरकारकडून दरवर्षी आणला जातो. मात्र, कृषी क्षेत्राला कर्ज देण्याचे उद्दिष्ट साध्य केल्याचे दाखविण्यासाठी या बँका काय शक्कल लढवतात आणि शेतकऱ्यांना कर्जापासून कसे वंचित ठेवतात, याची धक्कादायक माहिती मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात दिली आहे. विदर्भ, मराठवाड्यातील काही खासगी कंपन्या, नागरी पतसंस्थाांना या बँकांनी काही वर्षांत कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिले. शेतमालाची साठवणूक करण्यासाठी वेअरहाउसेस उभारण्यास हे कर्ज दिल्याचे दाखविले. त्यामुळे हे एक प्रकारे कृषीकर्जच असल्याचे भासविले व कर्जवाटपाचे उद्दिष्ट साध्य झाल्याचा देखावा निर्माण केला. प्रत्यक्षात या कर्जाचा (पान ४ वर)वसुलीसाठी तगादाएका खासगी वित्तीय कंपनीने विदर्भ, मराठवाड्यात कृषी कर्जाऐवजी जमिनींचे सातबारा उतारे घेऊन घरदुरुस्ती, बांधणीस कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिले. त्याचा व्याजदर कृषी कर्जापेक्षा दुप्पट आहे. आता या कंपनीने कर्जदार शेतकऱ्यांकडे वसुलीसाठी तगादा लावला आहे. अशा काही कर्जदार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची पुराव्यासह माहिती आपल्याकडे असल्याचे किशोर तिवारी म्हणाले.