शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

नालासोपा-यात पत्नीची निर्घृण हत्या; पाच वर्षाच्या मुलीने केला उलगडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 06:46 IST

नालासोपारा शहरात अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीने पत्नीच्या शरीराचे चार तुकडे करून निर्घृण हत्या केली. पण, पाच वर्षाच्या मुलीने हत्येचा उलगडा केल्यानंतर पोलिसांनी पतीला बेड्या ठोकल्या.

वसई : नालासोपारा शहरात अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीने पत्नीच्या शरीराचे चार तुकडे करून निर्घृण हत्या केली. पण, पाच वर्षाच्या मुलीने हत्येचा उलगडा केल्यानंतर पोलिसांनी पतीला बेड्या ठोकल्या. अजयने आपल्या तीन मुलांच्या समोरच सरोजची निर्घृण हत्या केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.नालासोपारा पूर्वेकडील शर्मावाडी येथील संजय यादव चाळीतील एका खोलीत अजय यादवने (३०) गुरुवारी रात्री आपली पत्नी सरोज यादवची (२८) अतिशय अमानुषपणे हत्या केली. अजयचा आपली पत्नी सरोजचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यातूनच अजयने गुरुवारी रात्री सरोजची गळा चिरून हत्या केली.आणि तिच्या शरीराचे तुकडे केले.आपली पत्नी सरोजची अशी निदर्यपणे हत्या केल्यानंतर अजय आपली मुले प्रयनसु यादव (१०), प्रयनसी यादव (५) आणि हिमांशी यादव (३) यांना घेऊन कामण येथील आपले वडील राम जीवन यादव यांच्या घरी गेला.त्याठिकाणी अजय जेऊन झोपी गेल्यानंतर त्याची पाच वर्षांची मुलगी प्रयनसीने वडिलांनी आईची हत्या केल्याचे सांगितले.त्यामुळे घाबरलेल्या राम जीवन यादव यांनी थेट अजयचे घर गाठले. त्याठिकाणी खिडकीतून आत डोकावून पाहिले असता आत सरोजचा मृतदेह दिसून आला. राम जीवन यांनी लगेचच तुळींज पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी सरोजचा खून केल्याप्रकरणी अजयला लगेचच अटक केली. एका पाच वर्षाच्या मुलीमुळे तिच्या आईच्या हत्याकांडाचा काही तासातच उलगडा झाला.