शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
11
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
12
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
13
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
14
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
15
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
16
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
17
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
18
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
19
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
20
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...

नालेसफाईचे काम कधीच पूर्ण होत नाही - उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2017 20:12 IST

नालेसफाई कधीच पूर्ण होत नसते. नालेसफाई पावसाच्या आधी आणि पावसाच्या नंतरही सुरूच असते. त्यामुळे नालेसफाई पूर्ण हा शब्द प्रयोग चुकीचा

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - पावसाळ्याला सुरुवात झाली की मुंबईत तुंबणाऱ्या पाण्यामुळे नालेसफाईचा प्रश्न ऐरणीवर येतो. मात्र नालेसफाईचे काम हे कधीच पूर्ण होत नाही, अशी कबुली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिली. मुंबईत पावसाळ्यापूर्वी सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांची उद्धव ठाकरे यांनी आज पाहणी केली. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ""नालेसफाई कधीच पूर्ण होत नसते. नालेसफाई पावसाच्या आधी आणि पावसाच्या नंतरही सुरूच असते. त्यामुळे नालेसफाई पूर्ण हा शब्द प्रयोग चुकीचा आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. पावसाळ्यात पाणी तुंबू न देणे महत्त्वाचे आहे.  त्यामुळे पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचं काम पूर्ण होईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.  
उद्धव ठाकरे म्हणाले,  "गेली अनेक वर्षे मी नालेसफाईची पहाणी मी करतोय. दरवेळी मला प्रश्नं विचारला जातो की, निवडणुकीच्या तोंडावर नालेसफाई ची पाहणी करता का?, आता निवडणुका तर होऊन गेलेल्या आहेत. माझं कर्तव्य म्हणून मी ही पाहणी करतोय. ही पाहणी करताना अनेक ठिकाणी सुधारणा झालेल्या आहेत. नाल्यांचे रुंदीकरण झालेलं आहे. याही वर्षी नालेसफाईचे काम सुरू आहे. किती टक्के सफाई झाली या प्रश्नात मला इंटरेस्ट नाही. मुळात पाणी तुंबू न देणे याकडे महापालिकेचं लक्ष आहे. गेल्या वर्षी पाणी तुंबले नाही. यावेळी ही माहापालिका दक्ष आहे. कुठे ही पाणी तुंबणार नाही याची दक्षता महापालिका घेणार आहे,"
नालेसफाईत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप निवडणुकीच्या वेळी प्रचारात केला गेला. पण, भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झाले नाही. केवळ निवडणुकीपुरते हे आरोप झाले, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. नालेसफाईच्या पाहणी दौऱ्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.