शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
2
एकीकडे युतीची चर्चा, पण दुसरीकडे मनसेचा बडा नेता मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन
3
आजीच्याच शाळेत जातोय नातू...! पृथ्वी अंबानीच्या शाळेचे नाव काय, फी किती? डोळेच विस्फारतील...
4
Lord Hanuman : हनुमंताला पाच भाऊ होते, तेही विवाहित; काय होती त्यांची नावे? जाणून घ्या!
5
iPhone युजर्ससाठी खूशखबर! ट्रम्प यांच्या धमकीनंतरही Apple नं टाटांना सोपावलं दुरुस्तीचं काम
6
छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा कडेलोट करा: हर्षवर्धन सपकाळ
7
Gold Price Today: सोनं झालं स्वस्त, खरेदीपूर्वी जाणून घ्या काय आहेत नवे दर?
8
पाकिस्तानने हेरगिरीसाठी महिलांचीच निवड का केली? गद्दार तुफैल-हारूनने चौकशीत सांगून टाकलं!
9
आधी आईनं गळा आवळला, त्यानंतर मामानं...; बारावीत शिकणाऱ्या मुलीसोबत घडलं भयंकर!
10
पाकिस्तानला भारतात दंगली घडवायच्या होत्या, पण..; जम्मू-काश्मीरमधून PM मोदींचा पाकला इशारा
11
"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?
12
रेपो रेटचा डबल धमाका! व्याजापोटीचे १.४८ लाख वाचणार, त्यातून ईलेक्ट्रीक स्कूटर घेतली तर आणखी... 
13
मनात आले तर डोनाल्ड ट्रम्प मस्कना अमेरिकेबाहेरही घालवू शकतात? बड्या हस्तीने वर्मावर बोट ठेवले...
14
प्रामाणिकपणा काय असतो? ते या डॉगीकडून शिका! जीवाची पर्वा न करता मालकाच्या मुलाला वाचवलं; सापानं अनेक वेळा घेतला चावा, पण... 
15
ट्रम्प आणि मस्क यांच्यात वाद; Tesla चे शेअर्स जोरदार आपटले, १५२ अब्ज डॉलर्स बुडाले
16
Video : गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करत होता नवरा, अचानक झाली बायकोची एन्ट्री! पुढे काय झालं बघाच
17
RCB चेंगराचेंगरी प्रकरणात पहिली अटक; कोण आहे न‍िख‍िल सोसाले? त्या घटनेत महत्वाची भूमिका
18
सदाशिव अमरापूरकर यांच्या मुलीने गाजवलंय बॉलिवूड! रितेश देशमुखसोबत 'या' सिनेमासाठी केलंय काम
19
"तो बागेत फिरायला गेलाय"... रोहित शर्मासंदर्भातील प्रश्न अन् पंतला आठवला हिटमॅनचा फेमस डायलॉग
20
“उद्धव यांनी एक फोन करावा, राज ठाकरे १०० पावले पुढे येतील, पण...”; मनसेची स्पष्ट भूमिका

नालेसफाईत सिडको प्रशासन ठरले फोल

By admin | Updated: June 29, 2016 02:24 IST

सिडको वसाहतीत नालेसफाईला उशिराने सुरुवात झाली. त्यामुळे पावसाळा सुरू झाला तरी नालेसफाईची कामे पूर्ण झालेली नाहीत.

कळंबोली : सिडको वसाहतीत नालेसफाईला उशिराने सुरुवात झाली. त्यामुळे पावसाळा सुरू झाला तरी नालेसफाईची कामे पूर्ण झालेली नाहीत. ठेकेदाराकडून केवळ चेंबरमधील गाळ काढण्यात आल्याने पहिल्याच पावसात सिडकोचा नालेसफाईचा दावा फोल ठरला आहे. तुलनेने पनवेल नगरपालिका क्षेत्रात चांगल्या पध्दतीने नालेसफाईची कामे झाल्याने कुठेही पाणी साचलेले नाही. खांदा वसाहत आणि नवीन पनवेलमध्ये जवळपास ५० कि.मी. पेक्षा जास्त लांबीचे नाले आहेत. पावसाळी नाल्यांची जोडणी होल्डिंग पाँडला करण्यात आली आहे. मात्र नाल्यांमध्ये माती, कचरा, प्लॅस्टिक जात असल्याने पाणी तुंबते. हीच परिस्थिती कळंबोली वसाहतीची असून २५ ते ३० किमी लांबीचे पावसाळी नाले या ठिकाणी आहेत. २६ जुलै २००५ साली नाले तुंबल्यामुळे या भागात पाणी भरल्याने मोठी हानी झाली होती. तेव्हापासून सिडकोकडून दरवर्षी नालेसफाईची कामे केली जातात. यंदा नवीन पनवेल, खांदा वसाहत व कळंबोलीत नालेसफाईला उशिरा सुरुवात झाली. कळंबोलीत सेक्टर-१४ व १५ मध्ये केवळ चेंबर्समधील गाळ काढण्यात आला. नवीन पनवेलमध्येही अनेक ठिकाणी अशीच कामे झाली आहेत. पाण्याचा निचरा होत नसल्याने पहिल्याच पावसात कित्येक ठिकाणी दीड ते दोन फूट पाणी सिडको वसाहतीत साचले होते. पनवेल नगरपालिकेने एप्रिल महिन्याच्या सुरूवातीपासूनच नालेसफाई सुरूवात केली. पावसाचे पाणी कुठे थांबू नये म्हणून तीन पथके चोवीस तास तैनात करण्यात आलेली आहे. त्यामुळे १२१ मिलीमीटर पाऊस पडूनही पाणी साचले नाही. परंतु सिडको वसाहतीत मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचत असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत आहे.पाण्याचा निचरा होत नसल्याने पहिल्याच पावसात कित्येक ठिकाणी दीड ते दोन फूट पाणी सिडको वसाहतीत साचले होते. तर काही ठिकाणी आता कामास सुरुवात केली आहे.