शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

नेरळच्या सरपंचपदी नाईक

By admin | Updated: April 27, 2016 03:23 IST

रायगड जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या नेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेच्या सदस्या सुवर्णा नाईक या विजयी झाल्या.

कर्जत : रायगड जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या नेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेच्या सदस्या सुवर्णा नाईक या विजयी झाल्या. सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत नाईक यांनी नेरळ विकास आघाडीच्या जान्हवी साळुंखे यांचा पराभव केला. नेरळ विकास आघाडीच्या राजश्री कोकाटे यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली.नेरळ ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी पीठासीन अधिकारी जे. टी. उबाळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. निर्धारित वेळेत नेरळ ग्रामपंचायतीच्या नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव सरपंचपदासाठी चार महिला सदस्यांनी अर्ज दाखल केले होते. विशेष सभेत दाखल अर्जांची छाननी करण्यात आली. त्यानंतर निर्धारित वेळेत दाखल अर्जांपैकी शेकापच्या संजीवनी हजारे आणि नेरळ विकास आघाडीच्या कौसर सहेद यांनी आपले नामांकन अर्ज मागे घेतले. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी शिवसेनेच्या सदस्या सुवर्णा नाईक आणि नेरळ विकास आघाडीच्या जान्हवी साळुंखे यांच्यात निवडणूक घेण्यात आली. त्यावेळी झालेल्या गुप्त मतदानात नाईक यांना नऊ, तर साळुंखे यांना आठ मते पडली. त्यामुळे सुवर्णा नाईक विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले. नवनिर्वाचित सरपंच शिवसेनेच्या सुवर्णा नाईक यांचे रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते तानाजी चव्हाण, अशोक भोपतराव आदींनी अभिनंदन केले. (वार्ताहर)