पनवेल : शरीरसौष्ठव स्पर्धेत मिस्टर इंडिया, महाराष्ट्र श्री असे अनेक किताब पटकावून महाराष्ट्राचे नाव उंचावणारा पनवेलचा नायब तहसीलदार सुहास खामकर सोमवारी ‘लाच श्री’ ठरला. 50 हजारांच्या लाच प्रकरणी खामकरला रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.
भारत o्री, आशिया o्री अशा एकामागून एक स्पर्धा जिंकून शरीरसौष्ठव स्पध्रेत दबदबा निर्माण करणा:या खामकरच्या कामगिरीची दखल घेऊन राज्य सरकारने त्यांची नियुक्ती नायब तहसीलदार म्हणून पनवेल येथे काही वर्षापूर्वी केली होती.
बाजीराव जाधव या व्यक्तीस सातबा:यावर नाव चढवायचे होते. त्यासाठी खामकर याने त्याला एक लाख रुपयांची लाच मागितली. यापैकी 50 हजारांची लाच स्वीकारताना खामकर याचा लिपीक गणोश खोगाडे याला आज दुपारी रायगड लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सापळा रचून पकडले.
खोगाडे यांच्याकडे चौकशी केली असता ही लाच खामकरच्या सांगण्यावरून घेण्यात आल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर, खामकर याला अटक करण्यात आली आहे. (वार्ताहर)
खामकरची कारकिर्द
च्रेल्वेच्या राष्ट्रीय स्पध्रेत सुवर्णपदकं जिंकणारा पहिला खेळाडू
च्मिस्टर आशिया (2क्1क्) किताब पटकावणारा पहिला भारतीय
च्नऊ वेळेचा मिस्टर इंडिया, 2क्1क् साली मिस्टर आफ्रिका सुवर्णपदक विजेताच्मिस्टर ऑलिम्पिया अॅमेचर आणि 7 वेळा मिस्टर महाराष्ट्र o्री
मान शरमेने झुकली
ज्याची जिद्द आणि चिकाटी यांचे उदाहरण देऊन अनेक महाराष्ट्रातील तरुण बॉडीबिल्डिंगकडे वळले आणि ज्याला त्यांनी आदर्श मानले, अशा सुहास खामकरच्या या कृत्याने भारतीय बॉडीबिल्डिंग संघटनेची आणि महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली.