शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नायब तहसीलदारावर फसवणुकीचा गुन्हा

By admin | Updated: January 16, 2015 05:51 IST

संजय गांधी निराधार योजनेचा शेकडो बोगस लाभार्थींना आर्थिक लाभ देणारा नायब तहसीलदार पी.पी. सोळंके याला १२ जानेवारी रोजी

धारणी (जि. अमरावती) : संजय गांधी निराधार योजनेचा शेकडो बोगस लाभार्थींना आर्थिक लाभ देणारा नायब तहसीलदार पी.पी. सोळंके याला १२ जानेवारी रोजी विभागीय आयुक्तांनी निलंबित केल्यानंतर या प्रकरणाची तक्रार उपविभागीय अधिकाऱ्यांनी धारणी पोलीस ठाण्यात केली आहे. त्यावरून पोलिसांनी गुरुवारी नायब तहसीलदारासह अपात्र लाभार्थींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.शासनाकडून निराधार वृद्धांसाठी राबविण्यात येणाऱ्या संजय गांधी योजना, वृद्धापकाळ, श्रावणबाळ, राजीव गांधी योजनेमध्ये २५ ते ४० वयोगटातील २ हजार बोगस लोकांना पात्र दाखवून शासनाचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार व कर्मचारी करीत होते. त्यामध्ये शेकडो बोगस लाभार्थींना खोटे दस्तऐवज तयार करणारे दहापेक्षा अधिक दलाल तहसीलमध्ये सक्रिय होते. त्यांनी आर्थिक आमिषाने वयाचा दाखला देणाऱ्या येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकांसह पूर्ण अहवाल दाखला देणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, पूर्ण अहवाल ओके म्हणणाऱ्या तलाठी आणि बँकेचे व्यवस्थापक, लेखापालाची चौकशी केली. बोगस नवयुवक लाभार्थींना अनुदानाची रक्कम थेट त्यांच्या हातात देताना वयाची पाहणी न करता या पूर्ण घोटाळ्यात सहभागी होऊन मूकसंमती देणारी टोळी सक्रिय असल्याचे उघड झाल्याने जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी अव्वल कारकुनासह तीन कर्मचाऱ्यांना ९ जानेवारी रोजी निलंबित केले होते.नायब तहसीलदार सोळंके याच्या निलंबनाचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना पाठवून संपूर्ण प्रकरणात एसडीओंवर फौजदारी कारवाईचे आदेशदेखील दिले आहेत. या प्रकरणी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून हा गैरप्रकार उघडकीस आणला होता़ (वार्ताहर)