शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

नागराज मंजुळे यांचा घटस्फोट कायदेशीरच!

By admin | Updated: May 14, 2016 03:04 IST

पुन्हा नांदविण्याची मागणी करणाऱ्या सुनीता लष्करे यांच्याशी ‘सैराट’फेम प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा २०१४मध्येच न्यायालयात रीतसर घटस्फोट झाल्याचे पुढे आले आहे.

पुणे : पुन्हा नांदविण्याची मागणी करणाऱ्या सुनीता लष्करे यांच्याशी ‘सैराट’फेम प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा २०१४मध्येच न्यायालयात रीतसर घटस्फोट झाल्याचे पुढे आले आहे. मात्र, फसवणूक करून आपल्याला घटस्फोट दिल्याचा आरोप सुनीता यांनी केला आहे.‘नागराज मंंजुळेची पत्नी करतेय धुणी-भांडी’ हे वृत्त ‘लोकमत’मध्ये शुक्रवारी प्रसिद्ध झाल्यानंतर सोशल मीडियावर याबाबत उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या.पडत्या काळात कष्ट करून साथ दिली, मात्र ज्यांच्यामुळे यश मिळाले त्यांनाच नागराज मंजुळे यांनीदूर लोटले, असा आरोप करीत मला पत्नी म्हणून पुन्हा नांदवावे, अशी मागणी मंजुळे यांच्या घटस्फोटीत पत्नी सुनीता यांनी गुरूवारी केली होती.मात्र, यासंबंधीची न्यायालयीन कागदपत्रे ‘लोकमत’च्या हाती आली असून या कागदपत्रांनुसार १० नोव्हेंबर २०१४ रोजी नागराज आणि सुनीता या दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला होता. यासाठी सुनीता यांना सात लाख रुपयांची एकरकमी पोटगीही देण्यात आली होती. शिवाय, सुनीता यांनी पत्नी म्हणून सर्व अधिकार सोडत असल्याचे तसेच भविष्यात कोणत्याही स्थावर वा जंगम मालमत्तेवर अधिकार मागितला नसल्याचेही कबुल केले होते. (प्रतिनिधी)सुनीता आठवी पास आहे. मंजुळे कुटुंबासाठी तिने अनेक खस्ता खाल्या. घटस्फोटाचा खटला दाखल झाल्यावर सततच्या तारखांनी ती वैतागून गेली होती. त्यामुळे तिने सह्या करून टाकल्या.- हरिश्चंद्र लष्करे, सुनीता यांचे वडीलआपल्याला फसवून घटस्फोट घेण्यात आला. आपण पैसेही घेतले होते. मात्र, घटस्फोट होत आहे, असे सांगण्यात आले नव्हते.- सुनीता लष्करे