शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर - पोलीस भरतीच्या लेखी परिक्षेत गोंधळ

By admin | Updated: May 17, 2016 17:43 IST

पोलीस भरतीच्या लेखी परिक्षेत प्रश्नपत्रिकेतील घोळ संशयास्पद ठरला, परिणामी परिक्षार्थ्यांनी ‘सेटींग‘चा आरोप करून जोरदार हरकत घेतली

ऑनलाइन लोकमत - 
नागपूर, दि. 17 - पोलीस भरतीच्या लेखी परिक्षेत प्रश्नपत्रिकेतील घोळ संशयास्पद ठरला. परिणामी परिक्षार्थ्यांनी ‘सेटींग‘चा आरोप करून जोरदार हरकत घेतली. त्यामुळे पोलीस मुख्यालयात प्रचंड गोंधळ उडाला. नारेबाजी, रस्तारोकोमुळे प्रचंड तणाव निर्माण झाला. पोलीस आयुक्तांनी संतप्त परिक्षार्थ्यांना आपल्या कक्षात बोलवून त्यांची समजूत काढल्यानंतर तब्बल ४ तासांनी तणाव निवळला.
 
पोलीस भरतीच्या मैदानी आणि इतर प्रक्रियेत यश मिळवलेल्या ३ हजार पात्र परिक्षार्थ्यांना आज सकाळी लेखी परिक्षेसाठी पोलीस मुख्यालयात बोलवण्यात आले होते. त्यानुसार, राज्याच्या कानाकोप-यातून पात्र परिक्षार्थी लेखी परिक्षेला हजर झाले. सकाळी ७ नंतर लेखी परिक्षा सुरू झाली. ए, बी. सी, डी अशा चार स्वरूपात प्रश्नपत्रिका तयार करण्यात आली होती. उत्तरासाठी चार पर्याय दिले होते. दहा वाजता दरम्यान पेपर संपवून हळूहळू विद्यार्थी मुख्यालयाच्या मैदानात जमू लागले. सकाळी १० च्या सुमारास  एकमेकांशी चर्चा करताना कोणते उत्तर बरोबर आणि कोणते चूक त्याबाबत शहानिशा करू लागले. प्रश्नपत्रिकेच्या बी संचात उत्तराची जी चार पर्याय दिली होती. त्यातील एक पर्याय काहीसा फिक्कट (पुसटसा) असल्याचे परिक्षार्थ्यांच्या लक्षात आले. पुसट असलेले सर्वच पर्याय योग्य उत्तर होते. त्यामुळे पोलीस अधिका-यांनी जाणीवपूर्वकच हा प्रकार केल्याचा विद्यार्थ्यांना संशय आला. यामुळे सेटींगची कुजबूज वाढली अन् गोंधळाला सुरूवात झाली. 
 
हजारेक परिक्षार्थी एकत्र झाले आणि त्यांनी परिक्षा केंद्रावरील पोलीस अधिका-यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून देत परिक्षा रद्द करण्याची मागणी लावून धरली. परिक्षा प्रमूख श्रीकांत तरवडे यांना ही बाब कळताच त्यांनी परिक्षार्थ्यांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिक्षार्थी ऐकायला तयार नव्हते. त्यांनी नारेबाजी सुरू केली.पोलीस मुख्यालयाजवळच्या रस्त्यावर ठाण मांडून रस्ता रोको केला. यामुळे प्रचंड तणाव वाढला. वातावरण चिघळण्याचे संकेत मिळाल्याने पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांनी परिक्षार्थ्यांना आपल्या कार्यालयात बोलवून घेतले. 
 
प्रश्नपत्रिकेच्या बी संचाची उत्तरे सोडविणा-या विद्यार्थ्यांपैकी किमान १० ते १५ जणांना ९० टक्के पेक्षा जास्त गूण मिळाल्याचे आढळल्यास ही लेखी परिक्षा रद्द केली जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले.
 
तिस-यांदा घोळ 
शहर पोलिसांच्या भरती प्रक्रियेतील घोळाची ही तिसरी वेळ आहे. पहिल्यांदा ही परिक्षा २२ एप्रिलला होणार होती. त्यावेळी उपस्थित झालेल्या अडचणीने परिक्षा पुढे ढकलण्यात आली. नंतर १० मे रोजी शासनाने जास्त पदासाठी भरती घेण्याचे आदेश दिल्याने लेखी परिक्षा पुढे ढकलण्यात आली. तर, तिस-यांदा आज प्रश्नपत्रिकेतील उत्तराचा पर्याय पुसट असल्याने संशयकल्लोळ वाढला. दरम्यान, आज रात्रीपर्यंत यावर निर्णय घेतला जाणार असल्याचे आयुक्तांनी पत्रकारांना सांगितले.