शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर सुपर फास्ट !

By admin | Updated: July 9, 2014 01:12 IST

रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी संत्रानगरीला आठ रेल्वेगाड्यांची भेट दिली आहे. यात दोन गाड्या नागपुरातून धावणार असून इतर आठ गाड्या नागपूरमार्गे धावणार आहेत. यात नागपूर ते बिलासपूर

दोन एक्स्प्रेस : आठ नवीन गाड्या धावणार नागपूर : रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी संत्रानगरीला आठ रेल्वेगाड्यांची भेट दिली आहे. यात दोन गाड्या नागपुरातून धावणार असून इतर आठ गाड्या नागपूरमार्गे धावणार आहेत. यात नागपूर ते बिलासपूर आणि सिकंदराबादपर्यंतच्या सेक्शनमध्ये रेल्वेगाड्यांचा वेग १६० ते २०० किलोमीटर पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे या मार्गावरील प्रवासी आता सुपर फास्ट होणार आहेत. रेल्वे अर्थसंकल्पात अमृतसर आणि पुण्यासाठी दोन रेल्वेगाड्या नागपुरातून धावणार आहेत. याशिवाय नागपूरमार्गे जाणाऱ्या इतर गाड्यांचा समावेश आहे. नागपूर ते बिलासपूर आणि सिकंदराबादपर्यंत रेल्वेगाड्यांचा वेग ताशी १६० ते २०० पर्यंत वाढविण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. फक्त विदर्भात चांदाफोर्ट-नागभीड रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि भुसावळ-बडनेरा-वर्धा थर्ड लाईनचे सर्वेक्षण करण्याचा उल्लेख अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. रेल्वेगाड्यांकडे दृष्टी टाकल्यास गोंदिया-मुजफ्फरपूर एक्स्प्रेसचा बरौनीपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. नव्या गाड्यात बल्लारशा मुंबई-काजीपेठ एक्स्प्रेस (साप्ताहिक) चालविण्यात येईल. नुकताच २५ जूनला रेल्वेच्या तिकिटाची दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे अर्थसंकल्पात दरवाढीची घोषणा करण्यात आली नसल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. अर्थसंकल्पात पीपीपी तत्त्वावर नव्याने विकसित करण्यात आलेल्या एअरपोर्टच्या धर्तीवर काही रेल्वेस्थानकांवर काही आधुनिक सुविधा देण्याची घोषणा करण्यात आली आहे. महानगर आणि काही महत्त्वाच्या जंक्शनच्या दहा रेल्वेस्थानकांचा विकास होणार आहे. परंतु यात कुठल्या रेल्वेस्थानकांचा समावेश असणार आहे याची घोषणा मात्र करण्यात आली नाही. यात नागपूर रेल्वेस्थानकाचा समावेश असल्याचा अंदाज आहे. जुन्या रेल्वेच्या प्रकल्पांसाठी कुठली तरतूद करण्यात आली याचे चित्र पिंक बुक आल्यानंतर स्पष्ट होणार आहे. काय होत्या अपेक्षा- प्रस्तावित वर्ल्ड क्लास स्टेशनच्या यादीत नागपूर रेल्वेस्थानकाच्या बाबतीत काहीच उल्लेख नाही. -कन्हान ते बुटीबोरीपर्यंत मेमू गाडी चालविण्याची घोषणा नाही.-वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्ग, नागपूर-सेवाग्राम थर्ड लाईनचा प्रकल्प, नागपूर-नागभिड ब्रॉडगेजचा प्रकल्प, छिंदवाडा-नागपूर ब्रॉडगेजचा प्रकल्पाबाबत निधीबाबत काहीच उल्लेख नाही. -नागपूरला झोन बनविण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष-नागपूर-दिल्ली दुरांतोची घोषणा नाही-तीर्थक्षेत्रासाठी एकही थेट रेल्वेगाडीची घोषणा नाही-नागपूर-पुणे गरीबरथ डेली करण्याचा निर्णय नाही-मागील रेल्वे अर्थ संकल्पात जाहीर करण्यात आलेल्या रेल्वे मेडिकल कॉलेज, मेकॅनाईज्ड लाँड्री, इंटिग्रेटेड सिक्युरिटी सिस्टीम, रेलनीर प्रकल्प, स्टेशनवर एक्झिक्युटिव्ह लाऊंज बनविण्यासह इतर घोषणांची अंमलबजावणी नाही. चांदा फोर्ट-नागभीड दुपदरीकरण आणि भुसावळ-बडनेरा-वर्धा तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाचा प्रस्ताव-रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी लोकसभेत सादर केलेल्या २०१४-१५ च्या रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील औरंगाबाद-चाळीसगाव आणि सोलापूर-तुळजापूर या दोन रेल्वे मार्गासह कर्जत-लोणावळा चौथा रेल्वे मार्ग, इटारसी-भुसावळ तिसरा रेल्वे मार्ग आणि विदर्भातील चांदा फोर्ट-नागभीड रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण तसेच भुसावळ-बडनेरा-वर्धा तिसऱ्या नव्या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.-नव्या रेल्वे मार्गांच्या सर्वेक्षणाचा प्रस्ताव दिला आहेत ते रेल्वे मार्ग असे-कनहनगढ-पनातूर-कनियुरु, मुगलसराय-भबुआ मार्गे नौघर-होशियारपूर-अम्ब अंदौरा, सिंगरौली-घोरावल-लूसा-गब्बूर-बेल्लारी, शिमोगा-शृंगेरी-मंगलौर, बदोवन-झारग्राममार्गे चांडिल-तालगुप्पा-सिद्धपूर, भबुआ-मुंडेश्वरी, जींद-हिसार, गदग-हरफनहल्ली-उना-हमीरपूर, उज्जैन-झलावाड-अगार-सुसनेर-सोयठ, हिसार-नरवाना, चारधाम-केदरानाथ- बद्रीनाथ, नयागढ-बांसपानी रेल्वे मार्गाचे दुपरीकरण, जयपूर-कोटा रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण, मंगलौर-उल्लाल-सूरतकल रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण, रेवाडी-महेंद्रगढ दुपदरीकरण.काय मिळालेथेट रेल्वेगाड्यानागपूर-अमृतसर वातानुकूलित साप्ताहिक एक्स्प्रेसनागपूर-पुणे वातानुकूलित साप्ताहिक एक्स्प्रेसनागपूरमार्गे जाणाऱ्या गाड्याविजयवाडा-नवी दिल्ली वातानुकूलित रेल्वेगाडीसिकंदराबाद-निजामुद्दीन प्रीमियम वातानुकूलित रेल्वेगाडीशालिमार-चेन्नई प्रीमियम वातानुकूलित रेल्वेगाडीकामाख्या-बंगळूर प्रीमियम वातानुकूलित रेल्वेगाडीजयपूर-मदुराई प्रीमियम एक्स्प्रेसहापा-बिलासपूर एक्सप्रेसमुंबई-काजीपेठ साप्ताहिक बल्लारशाहमार्गेविस्तार केलेली गाडीगोंदिया-मुजफ्फरपूर एक्स्प्रेसचा बरौनीपर्यंत विस्तार