शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर : बीफ बाळगणाऱ्या सलीम शहाला अटक

By admin | Updated: July 16, 2017 22:23 IST

तालुक्यातील गोमांस प्रकरणी गोरक्षकांनी मारहाण केलेल्या सलीम ईस्माईल शहा, रा. हत्तीखाना, काटोल यास जलालखेडा पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री अटक केली

ऑनलाइन लोकमतनरखेड, दि. 16 : तालुक्यातील गोमांस प्रकरणी गोरक्षकांनी मारहाण केलेल्या सलीम ईस्माईल शहा, रा. हत्तीखाना, काटोल यास जलालखेडा पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री अटक केली. त्याला रविवारी दुपारी नरखेड येथील प्रथम श्रेणी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला एक दिवसााची अर्थात सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सलीम हा गोमांस नेत असल्याच्या संशयावरून गोरक्षकांंनी त्याला भारसिंगी येथील बसस्टॉपजवळ अडविले आणि त्याच्या अ‍ॅक्टिव्हाची तपासणी केली. त्यात मांस ठेवले असल्याचे आढळून येताच तरुणांनी जलालखेडा पोलिसांना सूचना दिली. त्यातच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न करताना तरुणांनी त्याला जबर मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला होता. ही घटना बुधवारी (दि. १२) सकाळी घडली होती. सलीमवर नागपूर येथील मेयो रुग्णालयात उपचारही करण्यात आले. पोलिसांनी सलीमकडून त्याची अ‍ॅक्टिव्हा व मांस जप्त केले. सदर मांस हे गाईचे नसून बैलाचे असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले होते. पोलिसांनी हे मांस तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले. पोलिसांनी शनिवारी सायंकाळी या मांसाचा तपासणी अहवाल प्राप्त झाला असून, हे मांस गोवंशाचे असल्याचे त्या अहवालात नमूद केले होते. सलीमने पोलिसांना दिलेल्या माहितीच्या आधारे जलालखेडा पोलिसांनी सलीमविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ व गोवंश हत्याबंदी कायदा २०१५ कलम ५ (क) अन्वये गुन्हाही नोंदविला होता. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त होताच जलालखेडा पोलिसांनी त्याला शनिवारी मध्यरात्री १२.२१ वाजता अटक केली आणि रविवार दुपारी नरखेड येथील न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याने त्याला सोमवारी (दि. १७) पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. सलीमला तारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांना बुधवारी रात्री अटक केली होती. त्या चौघांनाही न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि. १७) पोलीस कोठडी सुनावली होती.