शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात एकही पीडित महिला नाही!

By admin | Updated: June 11, 2014 01:14 IST

राज्य शासनातर्फे अनेक कल्याणकारी योजना करण्यात येतात पण त्या सामान्य माणसांपर्यंत पोहोचतच नाही. बरेचदा शासनाच्या योजनांची माहितीही जनतेला होत नाही.

माहितीच्या अधिकारात उघड : मनोधैर्य योजनेची अंमलबजावणी व्हावीनागपूर : राज्य शासनातर्फे अनेक कल्याणकारी योजना करण्यात येतात पण त्या सामान्य माणसांपर्यंत पोहोचतच नाही. बरेचदा शासनाच्या योजनांची माहितीही जनतेला होत नाही. अत्याचार पीडित महिलांना पुन्हा नव्याने उभे राहण्याची जिद्द मिळावी म्हणून राज्य शासनाने मनोधैर्य योजना सुरू केली. पण अनेक शहरात या योजनेची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नसल्याची माहिती माहिती अधिकारात उघड झाली आहे. त्यात नागपुरात तर या योजनेंतर्गत एकही पीडित महिला नाही. ही योजना बलात्कार पीडित, अ‍ॅसिड हल्ल्यात बळी पडलेल्या महिला आणि बालकांचे लैंगिक शोषण झाल्यास त्यांना नव्याने समाजात उभे करण्यासाठी आणि त्यांना बळ देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. बलात्कार आणि लैंगिक शोषण होणाऱ्या बालक व त्यांच्या कुटुंबीयांचे समुपदेशन, त्यांना आर्थिक मदत आणि मानसोपचार तज्ज्ञांची सेवा मनोधैर्य योजनेंतर्गत नियुक्त केलेल्या समितीच्या शिफारशीनुसार देण्यात येतात. या योजनेत बलात्कार पीडितांना किमान दोन लाख व कमाल तीन लाख अर्थसाहाय्य करण्यात येते. राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागातर्फे ही योजना राबविण्यात येते. विभागाच्या अधिकाऱ्याने अशा प्रकारच्या घटनांत संबंधित पोलिसांकडून एफआयआरची प्रत मागून घ्यावी आणि स्वत:हून दखल घ्यावी, असा नियम आहे. त्यानंतर या प्रकरणात महिला व बालविकास विभाग अधिकाऱ्याने पीडितांना अर्थसाहाय्य मिळवून देण्याची योजना आहे. यात नागपुरात एकही महिला पीडित नसल्याची माहिती विभागातर्फे माहितीच्या अधिकारात अभय कोलारकर यांना देण्यात आली आहे, हे विशेष! आतापर्यंत राज्यात २४ मुले, ६६ पीडित महिलांना भरपाईदाखल रक्कम देण्यात आली तर अद्याप १०० पीडित महिलांना अर्थसाहाय्य देण्यात आले नाही. पण हे बहुतेक आकडे पश्चिम महाराष्ट्रातील आहे. अकोल्यातील पाच प्रकरणांपैकी २, गोंदियातील ६ प्रकरणापैकी तीन, भंडाऱ्यातील दहा प्रकरणांपैकी दोन मुले यांना मदत करण्यात आली आहे. सांगलीतील २५ प्रकरणांपैकी १३ प्रकरणे निधीअभावी प्रलंबित असल्याची माहिती आहे. मुळात या योजनेत काही पीडितांना अर्थसाहाय्य मिळाले, ही समाधानाची बाब असली तरी ज्या कारणांसाठी ही योजना सुरू करण्यात आली. त्याला अद्याप यश आलेले नाही. ही गंभीर प्रकरणे तितक्याच गंभीरपणे शासकीय आणि सामाजिक स्तरावर घेण्याची गरज असल्याचे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)